रश्मी जोयसर विद्यापीठात प्रथम

By Admin | Updated: December 29, 2014 00:01 IST2014-12-28T22:35:36+5:302014-12-29T00:01:43+5:30

वाणिज्य पदवी परीक्षेत विक्रमी गुण

First at Rashmi Joyce University | रश्मी जोयसर विद्यापीठात प्रथम

रश्मी जोयसर विद्यापीठात प्रथम

खेड : ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळाच्या ज्ञानदीप महाविद्यालयातील वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी रश्मी विनोद जोयसर हिने तृतीय वर्ष वाणिज्य शाखेत ९५.१४ टक्के गुण मिळवून मुंबई विद्यापीठात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला.
वाणिज्य शाखेमध्ये ८६ हजार विद्यार्थ्यांमधून तिने हे यश संपादन केले. सातपैकी चार विषयात ती प्रथम आहे. फायनान्शिअल अकौंटिंग अ‍ॅण्ड आॅडिटिंगमध्ये ३००पैकी २९४, बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये १००पैकी ९३ गुण प्राप्त केले आहेत. विद्यापीठाच्या सीजीपीएसचे ७ गुण व ओ ग्रेड तिला प्राप्त झाली आहे. या यशाबद्दल मुंबई विद्यापीठात कुलगुरु राजन वेळुकर यांच्या उपस्थितीत तिचा सत्कार करण्यात आला.
यावेळी विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाचे अधिष्ठाता डॉ. मधू नायर यांनी रश्मीचे विशेष कौतुक केले. यापूर्वीच्या विविध परीक्षांमध्ये तिने उत्तुंग यश मिळवित ज्ञानदीप महाविद्यालयाचे नाव रोशन केले होते. या यशाने महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन मिळावे, या हेतूने २००९ मध्ये स्थापन झालेल्या या महाविद्यालयाने अल्पावधीत मिळवलेले हे यश कौतुकास्पद आहे. प्राचार्य डॉ. सिद्धेश्वर गडदे (पनवेल), ए. पी. महाजन (डोंबिवली), डॉ. माधवी पेठे (विलेपार्ले), गोपाळ कलकोटी (मालाड), अशोक वाघ (भिवंडी), सी. ए. प्रदीप कामथेकर (माटुंगा) व ज्ञानदीप महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रशांत कुलकर्णी, सल्लागार मंडळातील सदस्य विजयचंद्र थत्ते, श्रीरंग बापट, ए. व्ही. कुलकर्णी, सॉलीसिटर शरद चिटणीस, उमेश बागल, मारुती आढाव, शीतल जारकोई, चंद्रसेन घुंबरे, अतुल आगलावे, संदीप यमकर, विठ्ठल सकुंडे, भरत गोंजारी, दीपक जाधव यांचे तिला मार्गदर्शन लाभले. संस्थाध्यक्ष अरविंद तोडकरी, माधव पेठे, प्रकाश गुजराथी, विनोंद बेंंडखळे, अप्पा पाटणे, रमणलाल तलाठी, पेराज जोयसर, भालचंद्र कांबळे, राकेश प्रसादे, चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, दीपक लढ्ढा, अनिल शिवदे, प्राचार्य भरत मोरे, राजकुमार मगदूम, पुर्वा मोरे व सर्व शिक्षकांनी तिचे अभिनंदन केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: First at Rashmi Joyce University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.