पाट येथील रामकृष्ण प्रासादिक मंडळ भजन स्पर्धेत प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 18:23 IST2017-10-01T18:23:20+5:302017-10-01T18:23:20+5:30
कुडाळ येथील श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या अॅड. कै. अभय देसाई स्मृती ४२ व्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत पाट येथील श्री रामकृष्ण प्रासादिक भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला तर वडखोलच्या श्री गोवर्धन प्रासादिक भजन मंडळाने द्वितीय व अणसुरच्य़ा सदगुरू प्रासादिक भजन मंडळाने तृतीय क्रमांक पटकाविला.

पाट येथील रामकृष्ण प्रासादिक मंडळ भजन स्पर्धेत प्रथम
कुडाळ, दि. १ : कुडाळ येथील श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या अॅड. कै. अभय देसाई स्मृती ४२ व्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत पाट येथील श्री रामकृष्ण प्रासादिक भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला तर वडखोलच्या श्री गोवर्धन प्रासादिक भजन मंडळाने द्वितीय व अणसुरच्य़ा सदगुरू प्रासादिक भजन मंडळाने तृतीय क्रमांक पटकाविला.
श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळाच्या वतीने भजन स्पर्धेचे आयोजन गेली ४२ वर्षे करण्यात येत असुन यंदा ही स्पर्धा दि. २१ सप्टेबर ते दि. २९ सप्टेबर या कालावधीत मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
या वर्षी या स्पर्धेत सुमारे ३२ संघानी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असुन स्वरधारा प्रासादिक भजन मंडळ (तांबोळी), दत्तगुरू प्रा. भ. मं. (वैभववाडी) व श्री निवजेश्वर प्रा. भ. मं. (निरूखे) या मंडळांचा उत्तेजनार्थ क्रमांक आला आहे.
तसेच उत्कृष्ठ गायक म्हणुन अमित तांबोळकर (स्वरधारा प्रा. भ. मं. तांबोळी), उत्कृष्ठ तबला वादक अमोल राऊळ (श्री स्वामी समर्थ प्रा. भ. मं. कलंबिस्त), उत्कृष्ठ हार्मोनियम वादक गुणाजी कदम (स्वरधारा प्रा. भ. मं. तांबोळी), उत्कृष्ठ पखवाज वादक संदीप मेस्त्री (मेजारेश्वर प्रा. भ. मं. नागवे) व उत्कृष्ठ चक्की वादक म्हणुन मानसी वराडकर ( ब्राह्मणदेव प्रा. भ. मं. तळवडे) या कलाकारांची निवड करण्यात आली आहे.
या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ दि. २ अॉक्टोबर रोजी संध्या ५:३० वा. श्री देव कुडाळेश्वर मंदीर येथे संपन्न होणार आहे. तसेच यावेळी फुगड्यांचा बहारदार कार्यक्रमाचे ही आयोजन करण्यात आले असुन सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.