शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या पावसात सिंधुदुर्गनगरी बनली तुंबानगरी, रस्त्याला आले तळ्याचे स्वरुप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 12:12 IST

निद्रिस्त प्राधिकरण जागे कधी होणार!

ओरोस : बीपरजॉय वादळामुळे लांबलेल्या पावसाने आज जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. आज सकाळी ११ च्यासुमारास चांगला पाऊस पडला. मात्र या पहिल्याच पावसाने सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्रातील रस्त्यांवर तळ्याचे साम्राज्य निर्माण केले आहे. त्यामुळे ही सिंधुदुर्गनगरी आहे की तुंबलेलीनगरी असा प्रश्न निर्माण होत आहे. ठीक ठिकाणी रस्तावर पाणी साचून राहत असल्याने या रस्त्यावर जाणाऱ्या वाहन चालकांसह फुटपाथ वरून चालणाऱ्या पादचाऱ्यांना ही त्या पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे गेली कित्येक दिवस झोपी गेलेली प्राधिकरणाच्या यंत्रणा कधी जागी होणार असा प्रश्न वाहन चालक आणि नागरिकांमधून उपस्थित केला जात असला.शेतकरी राजाही पावसाची आतुरतेने वाट पाहत होता. शेतीची कामे रखडली होती. मात्र आज सकाळ पासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. सकाळी ११ च्यासुमारास मुसळधार पावसाला सुरूवात झाली. दिवसभरात जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावला असला तरी जिल्ह्याच्या राजधानीत मात्र पडलेला पाऊस नागरिक आणि वाहन चालकांसाठी त्रासदायक ठरत आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या सिंधुदुर्गनगरी मधील रस्त्यावर ठीक ठिकाणी पाणी साचून राहिले आहे. पाण्याच्या या डबक्या मध्ये रस्ता हरवला आहे. रस्त्यावर पूर्ण पाणी असल्याने वाहन चालकांना या पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. तर फुटपाथ वरून चालणाऱ्या नागरिकांवर हे साचलेले पाणी वाहन गेल्यावर उडत असल्याने नागरिकही हैराण झाले आहे. त्यात चिकल साचला असल्याने तो उडून वाहन चालक आणि येथे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकाचे कपडेही खराब होत आहेत. त्यामुळे पहिल्याच पावसात रस्त्यावर ठीक ठिकाणी पाणी साचून राहिले असल्याने सिंधुदुर्गनगरी तुंबलेलीनगरी दिसून येत होती. 

निद्रिस्त प्राधिकरण जागे कधी होणार!सिंधुदुर्गनगरी मधील विविध रस्त्यावर पावसाळ्यात पाणी साचाण्याचे प्रकार गेली कित्येक वर्षे होत आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी रस्त्यालगतची गटार आणि पाण्याचा निचरा होणारी ठिकाण यांच्या साफसफाई होणे अपेक्षित होते. मात्र प्राधिकरण कडून त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आला आहे. त्यामुळे गेली कित्येक दिवस झोपी गेलेली प्राधिकरणाच्या यंत्रणा कधी जागी होणार असा प्रश्न वाहन चालक आणि नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस