शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांवर गोळीबार करून पसार, संशयित तिघांना आंबोलीत पकडले; राजापुरातील घटना

By अनंत खं.जाधव | Updated: September 6, 2023 13:21 IST

आंबोली : दारू वाहतूकीचा पाठलाग करणार्‍या राजापुर येथील उत्पादन शुल्कच्या पोलिस अधिकार्‍यांच्या गाडीवर गोळीबार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना आंबोली ...

आंबोली : दारू वाहतूकीचा पाठलाग करणार्‍या राजापुर येथील उत्पादन शुल्कच्या पोलिस अधिकार्‍यांच्या गाडीवर गोळीबार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना आंबोली येथे ताब्यात घेण्यात आले आहे. यातील दोघे सोलापूर जिल्ह्य़ातील तर एकजण राजस्थान येथील आहे. हा प्रकार काल, मंगळवारी रात्रीच्या सुमारास राजापुर येथे घडला. संशयित तिघांना आज, बुधवारी पहाटे शिताफीने कोल्हापुरच्या दिशेने पलायन करताना आंबोली येथे पकडण्यात आले.संशयित आरोपीत प्रविण परमेश्वर पवार (२५, रा. तांबाळे, ता. मोहोळ), शेखर नेताजी भोसले (२५, रा. खवणे, ता. मोहोळ), प्रेमकुमार जेटाराम चौधरी (२३, रा.गुडामलानी- बाडनेर राजस्थान) याचा समावेश आहे.राजापूर येथून दारू वाहतूक होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचला होता. यावेळी हे तीन युवक दारु वाहतूक करीत होते. यावेळी राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकारी पाठलाग करत असल्याचे संशयित आरोपीच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांवर फायरिंग केले. अन् सिंधुदुर्गच्या दिशेने पळ काढला. संशयितांना पकडण्यासाठी सावंतवाडी पोलिसांनी आंबोली येथे सापळा रचला. यामध्ये पहाटेच्या सुमारास या तिघांना पकडण्यास यश आले. ही कारवाई आंबोली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जगदीश दुधवडकर, हवालदार दीपक शिंदे, मनिष शिंदे, महेंद्र मातोंडकर, चंद्रकांत जंगले आदी पोलिस कर्मचार्‍यांनी केली. याप्रकरणी राजापुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्या तिघांना राजापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे, असे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस