शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

पडवणे येथील आगीत ४०० कलमे होरपळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 17:04 IST

Fire, Mango, sindhudurg पडवणे माळरानावर गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या अग्नितांडवाने रौद्र रूप धारण केल्याने ७० हेक्टर क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यात सुमारे ४०० कलमे होरपळून शेतमांगरालाही आगीची झळ पोहोचल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग शॉर्टसर्किटने लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देपडवणे येथील आगीत ४०० कलमे होरपळली आग शॉर्टसर्किटने लागल्याचा अंदाज

देवगड : पडवणे माळरानावर गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या अग्नितांडवाने रौद्र रूप धारण केल्याने ७० हेक्टर क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यात सुमारे ४०० कलमे होरपळून शेतमांगरालाही आगीची झळ पोहोचल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग शॉर्टसर्किटने लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.पडवणे येथील माळरानावर ३० नोव्हेंबर रोजी गवताला अचानक आग लागली होती. या आगीचा वाऱ्यामुळे भडका उडून आगीने रौद्ररूप धारण केले. आगीच्या झळीने सुमारे ७० हेक्टर क्षेत्र व्यापले गेल्याने आग आटोक्यात आणणे कठीण बनले होते.

पडवणे येथील सुमारे २०० ते २५० ग्रामस्थांनी बुधवारी सकाळपासून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र वाऱ्यामुळे व गवतामुळे आग नियंत्रणामध्ये येणे ग्रामस्थांना कठीण होऊन बसले होते. दिवसभर आग नियंत्रणात आणण्यास पडवणे ग्रामस्थ प्रयत्न करीत होते.

अखेर ते यशस्वी झाले. मात्र, या अग्नीतांडवामध्ये बागायतदारांची सुमारे ४०० हून अधिक कलमे आगीत होरपळली. तर प्रमोद रेवंडेकर यांच्या शेतमांगरालाही आगीची झळ बसली. आठ दिवसापूर्वी सौंदाळे बाऊळवाडी येथेही राणे यांच्या कलमबागेला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. 

टॅग्स :fireआगsindhudurgसिंधुदुर्गMangoआंबा