शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

Crime News -माणगाव येथे घराला आग; कागदपत्रे खाक; रानडुकरांच्या शिकारप्रकरणी दोघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 17:27 IST

गेले दोन दिवस रानडुकरांची शिकार करून त्यांचे सोपस्कार पूर्ण केले जात असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दिसून आले. याची माहिती बुधवारी वनविभागाला मिळताच त्यांनी याची गंभीर दखल घेत तपासकामास सुरुवात केली.

माणगाव : माणगाव येथील सावित्री जाधव या वृद्धेच्या राहत्या घराला शॉर्टसर्किटने आग लागून घरातील टीव्ही व इलेक्ट्रॉनिक साहीत्य तसेच शासकीय कागदपत्रे जळून खाक झाली. 

सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. ही घटना बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची अधिक माहिती गावचे पोलीस पाटील झोरे यांनी दिली. आगीची माहिती मिळताच शेजाºयांनी तत्काळ धाव घेत मदतकार्य केले. दरम्यान, या आगीत झालेल्या नुकसानीची भरपाई संबंधित कुटुंबाला देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. ही दुर्घटना घडली त्यावेळी सावित्री जाधव या एकट्याच घरात होत्या. मात्र, सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

रानडुकरांच्या शिकारप्रकरणी दोघे ताब्यात

  • वनविभागाची कारवाई : ३0 पर्यंत वनकोठडी, सोशल मीडियावरील व्हिडिओ आला अंगलट

मालवण : रानडुकरांची शिकार करून त्याचे सोपस्कार पूर्ण करीत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने याची गंभीर दखल वनविभागाने घेत गुरुवारी पहाटेच सुरेश रामचंद्र मापारी (५६, रा. वेरळ) व राजाराम अंकुश नेरुरकर (५८, रा. विरण) या दोन संशयितांना ताब्यात घेत अटक केली. त्यांना येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांना कुडाळ येथील पोलीस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात येणार आहे. या प्रकरणामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान, या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता असून त्यादृष्टीने तपास सुरू आहे. ज्यांची नावे तपासात पुढे येतील त्यांच्यावरही कारवाई केली जाणार असल्याचे वन विभागाचे वनक्षेत्रपाल अमृत शिंदे यांनी स्पष्ट केले.

गेले दोन दिवस रानडुकरांची शिकार करून त्यांचे सोपस्कार पूर्ण केले जात असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दिसून आले. याची माहिती बुधवारी वनविभागाला मिळताच त्यांनी याची गंभीर दखल घेत तपासकामास सुरुवात केली.यात गुरुवारी पहाटे रानडुकरांची शिकार करणाऱ्या सुरेश रामचंद्र मापारी व राजाराम अंकुश नेरुरकर या दोघांना ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल केला. त्यांना येथील न्यायालयात हजर केले असता ३० नोव्हेंबरपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली आहे. हे प्रकरण उघडकीस येताच तालुक्यात एकच खळबळ उडाली असून अनेकांचे धाबे दणाणले आहेत.वेरळ येथील एका विहिरीत १४ रानडुकरे पडली होती. शिकाऱ्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांना मारले. त्यानुसार संशयित दोन शिकाºयांना ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे.या गुन्ह्यात वापरलेली वाहने, हत्यारे ताब्यात घेण्याची कार्यवाही केली जाणार आहे. शिवाय तपासात ज्यांची नावे पुढे येतील त्यांच्याविरोधातही कारवाई केली जाणार असल्याचे वनक्षेत्रपाल अमृत शिंदे यांनी स्पष्ट केले.याबाबतचा अधिक तपास उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक आय. डी. जालगावकर, वनक्षेत्रपाल अमृत शिंदे, वनक्षेत्रपाल अमोल चिरमे, फिरत्या पथकाचे वनक्षेत्रपाल रमेश कांबळे हे करीत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkonkanकोकणsindhudurgसिंधुदुर्ग