शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

आचरा बाजारपेठेतील कापड दुकानाला आग, पाच लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 17:45 IST

आचरा बाजारपेठेतील अरूण ढेकणे यांच्या लक्ष्मी क्लॉथ स्टोअर्स या कापड दुकानास सोमवारी रात्री उशिरा लागलेल्या आगीत दुकानाच्या एका भागात ठेवलेले कपडे जळून सुमारे ५ लाख ३० हजार रुपयांचे नुकसान झाले.

ठळक मुद्देआचरा बाजारपेठेतील कापड दुकानाला आग पाच लाखांचे नुकसान : सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

आचरा : आचरा बाजारपेठेतील अरूण ढेकणे यांच्या लक्ष्मी क्लॉथ स्टोअर्स या कापड दुकानास सोमवारी रात्री उशिरा लागलेल्या आगीत दुकानाच्या एका भागात ठेवलेले कपडे जळून सुमारे ५ लाख ३० हजार रुपयांचे नुकसान झाले.आगीची घटना समजताच मदतीला धावून आलेल्या व्यापारी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि ग्रामस्थांनी तातडीने आग आटोक्यात आणल्याने संपूर्ण दुकान आगीपासून वाचले व मोठी दुर्घटना टळली.

आगीचे कारण समजू शकले नसले तरी ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत आचरा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.आचरा बाजारपेठेतील ढेकणे यांच्या लक्ष्मी क्लॉथ स्टोअर्स या कापड दुकानास आग लागली असल्याचे रस्त्याने जाणाऱ्या गांवकर या युवकाच्या लक्षात आल्यावर त्याने तातडीने याबाबत जवळच राहणाऱ्या कोदे, पाटकर यांना माहिती दिली. त्यानंतर मिनल कोदे, बाळू कोले, विजय पाटकर यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.या घटनेबाबत व्यापारी संघटनेला माहिती मिळताच संघटनेचे बाबू परूळेकर, निखिल ढेकणे, शैलेश शेट्ये, हेमंत गोवेकर, रुपेश हडकर तसेच मंदार आचरेकर, दाजी आचरेकर, पंकज आचरेकर, गणेश गोवेकर, परूळेकर आदींनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. वीज कंपनीचे कर्मचारी पिंट्या साळकर यांना बोलावून वीजपुरवठा खंडित करण्यात आला.मंगळवारी सकाळी व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ढेकणे यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला तसेच पोलीस तक्रार देण्यास सहकार्य केले. पोलीस कर्मचारी चव्हाण, कैलास ढोले, पोलीस पाटील जगन्नाथ जोशी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.कपड्यांनी पेट घेतल्याने आगीचा भडकाकपड्यांनी पेट घेतल्याने आगीचा भडका उडाला होता. पण सर्वांनी प्रसंगावधान दाखवित आग आटोक्यात आणल्याने दुकानाच्या एका भागात ठेवलेले कपडे जळून गेले. यात ब्लँकेट, चटई, लहान मुलांच्या गाद्या, बॅग्स, साड्या यांसह रेडिमेड कपडे जळून सुमारे ४ लाख ५० हजार रुपयांचे कपडे जळून गेले तर इमारतीचे सुमारे ८० हजारांचे नुकसान झाले आहे. 

टॅग्स :fireआगsindhudurgसिंधुदुर्ग