शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत आग लागून संसार बेचिराख,  अग्निशमन बंबाद्वारे आग आटोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 12:19 IST

Fire Sindhudurg : कणकवली शहरातील शिवसेना शाखेजवळ मोघे हॉस्पिटलच्या बिल्डिंगच्या तळमजल्यातील खोलीत आग लागून रेश्मा हजारे या फळविक्रेत्या महिलेचा अख्खा संसारच जळून बेचिराख झाला आहे . रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली .

ठळक मुद्दे कणकवलीत आग लागून संसार बेचिराख,  अग्निशमन बंबाद्वारे आग आटोक्यातनगराध्यक्ष समीर नलावडेंकडून त्या महिलेला ५ हजार रुपयांची आर्थिक मदत

कणकवली : कणकवली शहरातील शिवसेना शाखेजवळ मोघे हॉस्पिटलच्या बिल्डिंगच्या तळमजल्यातील खोलीत आग लागून रेश्मा हजारे या फळविक्रेत्या महिलेचा अख्खा संसारच जळून बेचिराख झाला आहे . रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली .नगरपंचायतीच्या अग्निशामक बंबाद्वारे आग आटोक्यात आणली . मात्र, या आगीत हजारे यांचे मोठे नुकसान झाले आहे . या घटनेची माहिती मिळताच कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे , नगरसेवक कन्हैया पारकर , शिवसेना पदाधिकारी सचिन सावंत , चेतन मुंज, रिमेश चव्हाण व नगरपंचायत कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.रेश्मा हजारे हीने आपल्या घरात देव्हाऱ्याजवळ दिवा लावला होता. तसेच ती घरकाम करीत होती. याच दरम्यान अचानक खोलीतील कपडे व गादीने पेट घेतला . त्यामुळे खोलीत सर्वत्र धुर पसरला होता. त्या खोलीतून येत असलेला धूर पाहून त्या कॉम्प्लेक्सच्या आसपासच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेत नगरपंचायतला घटनेची माहिती दिली.नगरपंचायतचा अग्निशामक बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाला. तसेच विशेष प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली . मात्र , तोपर्यंत हजारे यांच्या घरातील कपडे आणि अन्य वस्तू या आगीत बेचिराख झाल्या . आगीवर नियंत्रण आणण्यासाठी नगरपंचायत कर्मचारी गणेश लाड , प्रकाश राठोड , विनोद जाधव यांच्यासह अनेकांनी शर्थीचे प्रयत्न केले . दरम्यान, आगीत हजारे यांचा संपूर्ण संसारच बेचिराख झाल्याने नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी त्यांना ५ हजारांची तातडीची मदत केली.

 

टॅग्स :fireआगsindhudurgसिंधुदुर्ग