शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बोगस डॉक्टर्स शोधून कारवाई करा : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 15:53 IST

CoronaVirus Doctor Sindhudurg : कोविडच्या महामारीचा लाभ घेऊन काही बोगस डॉक्टर्स चुकीचे उपचार करण्याची शक्यता आहे. अशा डॉक्टरांना शोधून त्यांच्यावर कारवाई करावी. विशेषतः वैभववाडी आणि दोडामार्ग याठिकाणी लक्ष केंद्रित करावे. गेल्या तीन वर्षांत विविध कारणांनी झालेल्या मृत्यूंचा रुग्णालयनिहाय अहवाल सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.

ठळक मुद्देबोगस डॉक्टर्स शोधून कारवाई करा : उदय सामंत रुग्णालयनिहाय मृत्यूंचा अहवाल सादर करावा

कणकवली : कोविडच्या महामारीचा लाभ घेऊन काही बोगस डॉक्टर्स चुकीचे उपचार करण्याची शक्यता आहे. अशा डॉक्टरांना शोधून त्यांच्यावर कारवाई करावी. विशेषतः वैभववाडी आणि दोडामार्ग याठिकाणी लक्ष केंद्रित करावे. गेल्या तीन वर्षांत विविध कारणांनी झालेल्या मृत्यूंचा रुग्णालयनिहाय अहवाल सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.कणकवली तहसील कार्यालयात पालकमंत्री उदय सामंत यांनी कोविड १९ प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि लसीकरणाबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीला खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, सहायक जिल्हाधिकारी संजिता महोपात्रा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, प्रांताधिकारी वैशाली राजमाने उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात विशेषतः दोडामार्ग आणि वैभववाडीमध्ये काही बोगस डॉक्टर्स वैद्यकीय उपचार करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा डॉक्टरांना शोधून त्यांच्यावर कारवाई करावी.

बोगस डॉक्टरांचे सर्वेक्षण करण्याबाबत सूचना करून खासदार राऊत म्हणाले, आयुष रुग्णालयात दोन वर्गखोल्या करण्याबाबत आरोग्य विभागाने लक्ष द्यावे. त्याचबरोबर लसीकरणावरही भर द्यावा. रुग्णांच्या नातेवाइकांवर खासगी रुग्णालयाकडून बिलांची जादा आकारणी होऊ नये, याबाबत नियुक्त करण्यात आलेल्या लेखाधिकाऱ्यांकडून बिले कमी केल्याबाबतची माहिती घेण्याची सूचना त्यांनी केली.यावेळी संदेश पारकर, डॉ. संदेश कांबळे, तहसीलदार रमेश पोवार, जिल्हा प्रशासन अधिकारी वैभव साबळे आदी उपस्थित होते.चाचण्यांचे प्रमाण वाढवा : सामंतआठवडानिहाय जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट, लसीकरण, मृत्यूदर, बरे होऊन घरी गेलेले रुग्ण याबाबतची पालकमंत्र्यांनी माहिती घेतली. यावेळी तसेच चाचण्यांचे प्रमाण अजूनही वाढवा. त्याचबरोबर लसीकरणावरही भर द्या. आशा, अंगणवाडी सेविका, त्याचबरोबर परिचारिका यांना आवश्यक असणारी साधनसामग्री वेळेत द्यावी.

गेल्या तीन वर्षांत विविध कारणांनी जिल्ह्याचा मृत्यूदर कसा होता, याबाबतचा एक अहवाल सादर करावा. यामध्ये खासगी रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयाकडे उपचारासाठी आलेल्या रुग्णांची संख्या आणि त्यांना असणारे आजार, याबाबतचा समावेश असावा असेही पालकमंत्री उदय सामंत म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdocterडॉक्टरUday Samantउदय सामंतsindhudurgसिंधुदुर्ग