कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय घडामोडींचे केंद्रबिंदू असलेल्या कणकवली येथील अप्पासाहेब पटवर्धन चौकात यापूर्वी असलेले सीसीटीव्ही कॅमेरे महामार्ग चौपदरीकरणाच्या कामामुळे काढण्यात आले होते. याबाबत प्रसिद्धीमाध्यमांमधून आवाज उठविल्यानंतर त्याची तातडीने दखल घेण्यात आली आहे.कणकवली पटवर्धन चौकात तीन सीसीटीव्ही बसविण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सूचनेनुसार टीम दाखल झाली होती. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. तसेच या सीसीटीव्हीबरोबरच नियंत्रण कक्षाशी जोडली जाणारी ध्वनिक्षेपक यंत्रणा येथे आता कार्यरत होणार आहे.यापूर्वी कणकवलीतील अप्पासाहेब पटवर्धन चौकात सीसीटीव्ही आणि नियंत्रण कक्ष तसेच कणकवली पोलीस ठाण्याशी जोडलेली ध्वनिक्षेपक यंत्रणा सुरू होती. मात्र, महामार्ग चौपदरीकरणाच्या कामानंतर हे सीसीटीव्ही काढण्यात आले. पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या सूचनेनुसार पटवर्धन चौकात तीन सीसीटीव्ही बसविण्यासाठी टीम दाखल झाली. त्यामुळे अनेक राजकीय घडामोडींचे केंद्रस्थान असलेल्या कणकवलीतील अप्पासाहेब पटवर्धन चौकातील घडामोडींवर पोलिसांचे लक्ष राहणार आहे.
...अखेर कणकवली मुख्य चौकात तीन सीसीटीव्ही कॅमेरे सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 18:18 IST
Cctv Police Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय घडामोडींचे केंद्रबिंदू असलेल्या कणकवली येथील अप्पासाहेब पटवर्धन चौकात यापूर्वी असलेले सीसीटीव्ही कॅमेरे महामार्ग चौपदरीकरणाच्या कामामुळे काढण्यात आले होते. याबाबत प्रसिद्धीमाध्यमांमधून आवाज उठविल्यानंतर त्याची तातडीने दखल घेण्यात आली आहे.
...अखेर कणकवली मुख्य चौकात तीन सीसीटीव्ही कॅमेरे सज्ज
ठळक मुद्दे...अखेर कणकवली मुख्य चौकात तीन सीसीटीव्ही कॅमेरे सज्जचौकातील घडामोडींवर पोलिसांचे लक्ष राहणार