शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस पुन्हा सक्रिय, शेतकरी सुखावला

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: June 20, 2024 16:34 IST

खोळंबलेली भात लावणीची कामे सुरू होणार

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून रुसलेला मान्सून अखेर आजपासून (गुरूवार ) पुन्हा सक्रिय झाला असून त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात मान्सून दाखल झाला होता. मात्र त्यानंतर पंधरा दिवस पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होता. पहिल्या पावसात भात पेरणी केल्यानंतर शेतकऱ्याला भात लावणीसाठी मोठ्या पावसाची गरज असते. पावसाने दडी मारल्याने भात लावणीची कामे खोळंबली होती. आता संतदार पाऊस कोसळू लागल्याने भात लावणीच्या कामांनाही वेग येणार आहे. जून महिन्याचा दुसरा आठवडा संपून गेला तरी पाऊस पडत नसल्याने पाण्याचा प्रश्न उद्भवत होता. आता आज, गुरुवारी सकाळपासून संततदार पावसाने सुरुवात केल्यामुळे नदी-नाले भरून वाहत आहेत.जून महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो गतवर्षी मात्र तो पडला नव्हता. त्यामुळे जिल्ह्याची सरासरी सुद्धा भरली नव्हती. यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा जास्त असल्याचा अंदाज हवामान खात्याने अगोदरच वर्तवलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान होते.महाराष्ट्राच्या उर्वरित भागात मान्सून सक्रिय झाला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र तो हवा तसा पडला नसल्यामुळे चिंता पसरली होती. परंतु आता जूनच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात पाऊस आपली राहिलेली सरासरी भरून काढेल असा अंदाज वर्तवण्यास काही हरकत नाही.आज, सकाळपासूनच मेघगर्जनेसह दमदार पावसाने सुरुवात केल्यामुळे आता आगामी दोन दिवस संततदार पाऊस कोसळेल असे वातावरण आहे. नदी नाल्यांना पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तर पर्यटनात्मकदृष्ट्या सिंधुदुर्ग मधील सर्व धबधबे दोन दिवस पाऊस पडल्यास तुडुंब भरून वाहणार आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊसFarmerशेतकरीfarmingशेती