शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नशेत केलेले प्रताप महागात, बेशिस्त वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 16:22 IST

Crimenews Kankavli Police Sindhudurg : कणकवली शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौकात कार्यरत असलेल्या आरोग्य पथक व पोलिसांशी हुज्जत घालत अरेरावी केल्याप्रकरणी तरंदळे बौद्धवाडी येथील अजित मनोहर कदम याला पोलिसांनी ताब्यात घेतले. एकेरी भाषेत पोलिसांना दादागिरी करण्याचा त्या तरुणाचा प्रयत्न अखेर त्याच्या अंगाशी आला. तो तरुण मद्यपान करून असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्देबेशिस्त वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल कणकवलीत पोलिसांशी हुज्जत घालणे पडले महागात

कणकवली : शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौकात कार्यरत असलेल्या आरोग्य पथक व पोलिसांशी हुज्जत घालत अरेरावी केल्याप्रकरणी तरंदळे बौद्धवाडी येथील अजित मनोहर कदम याला पोलिसांनी ताब्यात घेतले. एकेरी भाषेत पोलिसांना दादागिरी करण्याचा त्या तरुणाचा प्रयत्न अखेर त्याच्या अंगाशी आला. तो तरुण मद्यपान करून असल्याचे पोलिसांनी सांगितले.आरोग्य पथकाच्या कर्मचार्‍यांनाही त्याने वारंवार त्रास देत एकेरी भाषेत बोलून त्यांच्या कामात अडथळा निर्माण केला. दरम्यान याचवेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने तरुणाने पोलिसांशी देखील वाद घातला. तसेच खंडागळे यांच्या देखील अंगावर जात अरेरावीचा प्रयत्न केला. तर त्या तरुणाकडून पोलिसांनी माझ्या कानशिलात मारले असा आरोप केलाय. अखेर त्याला पोलिसांनी ताब्यात घेत त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तो तरुण मद्यपान करून असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.नशेत असलेल्या त्या तरूणाने केलेले प्रताप आता त्याला महागात पडणार आहे .त्या तरुणाला वैद्यकीय चाचणीसाठी कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले असता तेथे देखील त्या तरुणाने पोलिसांशी वाद घातल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी पोलिसांकडून त्यांच्यावर बेशिस्त वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सागर खंडागळे यांनी दिली. हा प्रकार कणकवली पटवर्धन चौकात शनिवारी दुपारी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडला . याप्रसंगी तेथे पोलिसांसह कणकवली मुख्याधिकारी व नगरपंचायतचे पथक देखील उपस्थित होते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKankavli Police Stationकणकवली पोलिस स्टेशनsindhudurgसिंधुदुर्ग