‘किमया चुंबकाची’ राज्यात पाचवा

By Admin | Updated: January 23, 2015 23:37 IST2015-01-23T21:15:57+5:302015-01-23T23:37:57+5:30

देवरुखात विज्ञान प्रदर्शन : राज्यातील ३६ शिक्षकांचा सहभाग

Fifth in the state of 'kimaya magnet' | ‘किमया चुंबकाची’ राज्यात पाचवा

‘किमया चुंबकाची’ राज्यात पाचवा

सावंतवाडी : देवरूख-रत्नागिरी येथे झालेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात घोडगेवाडी-दोडामार्ग येथील कीर्ती विद्यालय प्रशालेचे शिक्षक प्रसाद एकनाथ विर्नोडकर यांनी सादर केलेल्या ‘किमया चुंबकाची’ या प्रकल्पाला राज्यात पाचवा क्रमांक प्राप्त झाला.
प्रसाद विर्नोडकर यांच्या प्रकल्पाला ‘माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक निर्मित शैक्षणिक साहित्य’ या गटात पाचवा क्रमांक मिळाला. महाराष्ट्रातील एकूण ३६ जिल्ह्यातील शाळांच्या शिक्षकांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला. रत्नागिरी येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांना प्रशस्तिपत्र, सन्मानचिन्ह व पुरस्काराने गौरविण्यात आले. विर्नोडकर यांनी यापूर्वी तालुकास्तरावर तेरावेळा व जिल्हास्तरावर चारवेळा क्रमांक प्राप्त केले आहेत. राज्यस्तरावरील पहिल्याच प्रयत्नात त्यांनी यश प्राप्त केले.
या यशाबाबत विर्नोडकर यांचे माध्यमिक विभाग विस्तार अधिकारी, प्रशालेचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थांनी अभिनंदन केले. (वार्ताहर)

राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रसाद विर्नोडकर यांच्या प्रतिकृतीस पाचवा क्रमांक मिळाला.

Web Title: Fifth in the state of 'kimaya magnet'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.