शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय मंत्री नारायण राणेंशी कणकवली पोलिसांची पंधरा ते वीस मिनिटे चर्चा, निवासस्थानी जाऊन घेतली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2021 16:49 IST

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी कणकवली पोलिसांनी नोटीस बजावली होती.

कणकवली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी कणकवली पोलिसांनी नोटीस बजावली होती. या नोटीसीला मंत्री राणेंनी पत्राद्वारे काल, बुधवारी उत्तर दिले होते. असे असतानाच आज कणकवली पोलिसांनी मंत्री राणे यांची त्यांच्या ओम गणेश या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.कणकवली पोलिसांनी दुपारी एक ते दिड तासापूर्वी मंत्री राणे यांची त्यांच्या ओम गणेश या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तब्बल पंधरा ते वीस मिनिटे पोलीस आणि राणे यांच्यात चर्चा सुरू होती. मात्र या चर्चेचा तपशील समजू शकला नाही. पोलिसांनीही या चर्चेबाबत बोलण्यास नकार दिला. मंत्री राणें यांच्या भेटीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे पथक होते. यात नेमकी आमदार नितेश राणे याच्याबाबत माहिती घेतली असावी असा अंदाज आहे. किंवा कालच्या पोलीस नोटीसी बाबत जबाब नोंदवला असावा अशी शक्यता आहे. कारण कालच राणें यांनी आपण पुढील दोन, तीन दिवस कामात व्यस्त आहे. त्यामुळे तशी आवश्यकता असल्यास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बजावलेल्या नोटीसीबाबत मी जबाब नोंदवण्याचा तयार आहे अशा आशयाचे पत्र कणकवली पोलीस ठाण्यात दिले होते.मंत्री राणे हे काल, बुधवार रात्री पासूनच कणकवली येथील बंगल्यात आहेत. त्यांनी आज दिवसभर जिल्हा बॅंक निवडणुकीसंदर्भात स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून माहिती घेतली तसेच गाठीभेटी घेतल्या. आज सकाळपासून जिल्हा बँक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरु आहे. कणकवली मतदान केंद्रावर झालेली बाजाबाजी वगळता मतदान सुरळीत पार पडत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNarayan Raneनारायण राणे Policeपोलिस