एकाच दिवशी पंधरा बंधारे
By Admin | Updated: November 16, 2014 00:23 IST2014-11-16T00:20:19+5:302014-11-16T00:23:48+5:30
बालदिनाचे औचित्य : सातार्डा ग्रामपंचायतीचा उपक्रम

एकाच दिवशी पंधरा बंधारे
सातार्डा : बालदिनाचे औचित्य साधून सातार्डा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात एकाच दिवशी १५ बंधारे बांधून पूर्ण करण्यात आले. या बंधाऱ्यांच्या कामाचा शुभारंभ पंचायत समिती सदस्या शुभांगी गोवेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
सातार्डा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात बालदिनाचे औचित्य साधून ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ मोहिमेंर्गत सातार्डा ग्रामपंचायतीने १५ वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित करून त्याची पूर्तता केली. सातार्डा ग्रामपंचायत व पंचायत समिती सावंतवाडी यांच्या माध्यमातून तसेच ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी एन. आर. तांबे व क्षेत्रीय अधिकारी जानकर व सरपंच उदय पारिपत्ये तसेच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी, इतर शासकीय कर्मचारी यांच्या सहकार्यातून १५ वनराई बंधाऱ्यांचे उद्दिष्ट एकाच दिवसात पूर्ण करण्यात आले. बंधाऱ्याच्या उद्घाटनप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र टेमकर, गजानन शिरसाट, स्मिता मांजरेकर, सरपंच उदय पारिपत्ये, ग्रामविकास अधिकारी तांबे, सातार्डा विकास सहकारी सोसायटीचे अध्यक्ष नामदेव गोवेकर व ग्रामस्थ उपस्थित होते. या कामी आरोग्य खाते, कृषी विभाग, सातार्डा शाळा नं. १, शाळा नं. २, शाळा नं. ३, पशुसंवर्धन, सातार्डा हायस्कूल, कृषी विभाग, अंगणवाडी, अंगणवाडी क्र. १, ग्रामपंचायत, रायाचे पेड शाळा यांच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. (वार्ताहर)