मळगावात मान्यवरांचा सत्कार
By Admin | Updated: January 5, 2015 22:05 IST2015-01-05T21:27:13+5:302015-01-05T22:05:56+5:30
शतकमहोत्सव: शारदा विद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन

मळगावात मान्यवरांचा सत्कार
तळवडे : येथील शारदा विद्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रस्तावाडाच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमात शिक्षण, आरोग्य, सामाजिक क्षेत्रातील ४० जणांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शतकमहोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांकरिता विविध स्पर्धा आणि उपक्रमांचे आयोजन केले. यावेळी सावंतवाडी पंचायत समिती माजी सभापती प्रियांका गावडे, राजेंद्र परब, जिल्हा परिषद कामगार अधिकारी शेखर पाडगावकर यांचाही सत्कार करण्यात आला. मळगावात ज्येष्ठ व्यक्ती या शिक्षण व्यवस्था योग्यप्रकारे हाताळत आहेत. येथील सामाजिक विकासाला
वाहून घेणाऱ्या व्यक्तीची आदर्श, प्रेरणा आजच्या तरुण पिढीने घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य खात्याचे सभापती गुरुनाथ पेडणेकर यांनी येथे केले.
कार्यक्रमाला सावंतवाडी नगरपालिका सभापती वैशाली पटेकर, मळगाव सरपंच नीलेश कुडव, सावंतवाडी पंचायत समिती सभापती प्रमोद सावंत, बँक आॅफ इंडिया सावंतवाडीचे शाखाव्यवस्थापक नंद प्रभूदेसाई, पंचायत समितीचे
माजी सभापती राजेंद्र परब, शिवाजीराव देसाई, दिलीप सोनुर्लेकर,
रमेश कासकर, प्रा. गणपत शिरोडकर, शिवाजी देसाई, गीता सामंत, चंद्रकांत सामंत, दिगंबर सामंत, डी. के. गावकर, तेजपाल सावळ, आनंद देवळी, महेश शिरोडकर, अर्जुन देवळी, दिवाकर राऊळ, गंगाबाई गोवेकर, रवींद्र कांबळी व इतर मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
केंद्रशाळांमध्ये इंटरनेट सुविधा
जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता व दर्जा वाढविण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील १४४ जिल्हा परिषद केंद्र शाळांमध्ये ई- लर्निंग व इंटरनेट सुविधा सुरू करण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषदेने प्रथमच असा उपक्रम हाती घेतला असल्याची माहिती यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर यांनी दिली.