‘महिला दक्षता’च्या सदस्याचा सत्कार

By Admin | Updated: March 9, 2015 23:53 IST2015-03-09T21:15:47+5:302015-03-09T23:53:08+5:30

महिला दिन : बांदा पोलीस स्थानकाच्यावतीने आयोजन

Felicitated a member of 'Mahila Vigilance' | ‘महिला दक्षता’च्या सदस्याचा सत्कार

‘महिला दक्षता’च्या सदस्याचा सत्कार

बांदा : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून येथील पोलीस स्थानकाच्या महिला दक्षता समितीच्या सदस्या मंगल कामत यांचा रविवारी सायंकाळी बांदा पोलीस स्थानकाच्यावतीने पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुठे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी पोलीस उपनिरीक्षक सुधाकर आरोलकर, सचिन नावडकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना गुठे म्हणाले की, मंगल कामत या महिला दक्षता समितीच्या सदस्या आहेत. त्यांचे महिलाविषयक तपासात महत्त्वपूर्ण व तत्पर सहकार्य लाभते. महिलांच्या समस्यांबाबत त्या नेहमीच जागरुक असतात. महिलांवर विविध कारणांनी होणारे अत्याचार तसेच महिलांच्या न्यायहक्कांसाठी त्या नेहमीच महिलांसाठी आधारवड राहिल्या आहेत. त्यांचे कार्य आदर्शवत असून महिलांच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.यावेळी मंगल कामत यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. आभार संतोष परब यांनी मानले. यावेळी नीलेश मोरजकर, मयुर चराटकर, प्रवीण परब, आशुतोष भांगले, रोहित कशाळीकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Felicitated a member of 'Mahila Vigilance'