शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: चराठे येथे घराची भिंत कोसळून बाप-लेक गंभीर जखमी 

By अनंत खं.जाधव | Updated: August 1, 2024 16:04 IST

सावंतवाडी : गेले काही दिवस मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे चराठे गावठणवाडी  येथे घराची भिंत कोसळून बाप लेक गंभीर जखमी ...

सावंतवाडी : गेले काही दिवस मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे चराठे गावठणवाडी  येथे घराची भिंत कोसळून बाप लेक गंभीर जखमी झाले. यशवंत बिर्जे व मुलगा गणपत बिर्जे अशी जखमींची नावे आहेत. आज, गुरुवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने त्यांची पत्नी योगिता आणि मुलगी अक्षता दुसऱ्या खोलीमध्ये झोपल्यामुळे त्या दोघी बचावल्या.सावंतवाडी तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पडझडीच्या घटना घडत आहेत. चराठा गावठणवाडी येथे राहणाऱ्या यशवंत बिर्जे याचे घर आहे. पहाटेच्या सुमारास त्यांच्या घराची मोठी भिंत कोसळली. गाढ झोपेत असलेले यशवंत बिर्जे आणि मुलगा गणपत बिर्जे हे दोघेही या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली सापडले. यावेळी गणपत यांनी जीवाच्या आकांताने आरडाओरड केल्यानंतर त्यांचे भाऊ विनायक आणि राजू बिर्जे यांनी तात्काळ धाव घेत त्यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले.जखमी बाप-लेकांना तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. गणपतच्या डोक्यावर खोल जखम झाल्याने शस्त्रक्रिया करण्यात आली. तर, यशवंत बिर्जे यांना अधिक उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

भर पावसात व्हावे लागले बेघर या घटनेत बिर्जे कुटुंबीयांचे सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. बिर्जे कुटुंबीयांची परिस्थिती गरिबीची असून इंदिरा आवास योजनेतून त्यांनी हे घर बांधले होते. या घटनेमुळे भर पावसात त्यांना बेघर व्हावे लागले. घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी झाली होती. महसूल विभागाकडून घटनेची दखल घेत तातडीचा पंचनामा करणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊसSawantwadiसावंतवाडी