शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

त्या शिक्षकांचे पगार न झाल्यास उपोषण, सतीश सावंत यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 12:40 IST

५० माध्यमिक शिक्षकांना मान्यता न देता माध्यमिक शिक्षण विभागाने त्या शिक्षकांवर अन्याय केला आहे. आर्थिक इंटरेस्टमुळेच ही मान्यता स्थानिक पातळीवर रखडवली जात असल्याचा सनसनाटी आरोप गटनेते सतीश सावंत यांनी करीत माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना धारेवर धरले.

ठळक मुद्देत्या शिक्षकांचे पगार न झाल्यास उपोषण, सतीश सावंत यांचा इशारा जिल्हा परिषद स्थायी समिती सभा; शिक्षणाधिकाऱ्यांना धरले धारेवर

सिंधुदुर्ग : न्यायालयीन लढा देत केस जिंकलेल्या ५० माध्यमिक शिक्षकांना मान्यता न देता माध्यमिक शिक्षण विभागाने त्या शिक्षकांवर अन्याय केला आहे. न्यायालय त्या शिक्षकांना माध्यमिक विद्यालयात रूजू होण्याचे आदेश देत असताना चुकीच्या पद्धतीने त्यांचे अ‍ॅप्रूव्हल रोखून धरणे हे योग्य नाही. यामागील सूत्रधार एका संघटनेचा पदाधिकारी असून त्याच्या आर्थिक इंटरेस्टमुळेच ही मान्यता स्थानिक पातळीवर रखडवली जात असल्याचा सनसनाटी आरोप गटनेते सतीश सावंत यांनी करीत माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना धारेवर धरले. गणेश चतुर्थीपूर्वी या ५० शिक्षकांचे पगार न झाल्यास या शिक्षकांसह आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशाराही सावंत यांनी दिला.सिंधुदुर्गजिल्हा परिषद स्थायी समितीची सभा अध्यक्षा संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकरी के. मंजुलक्ष्मी, उपाध्यक्ष रणजित देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, सभापती जेरॉन फर्नांडिस, अंकुश जाधव, डॉ. अनिशा दळवी, पल्लवी राऊळ, सदस्य सतीश सावंत, रेश्मा सावंत, अमरसेन सावंत, विष्णुदास कुबल, संतोष साटविलकर, राजेंद्र म्हापसेकर उपस्थित होते.पंधरा वर्षे माध्यमिक विद्यालयात एकही पैसा मानधन न घेता सेवा बजावणाऱ्या ५० शिक्षकांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. या लढ्यात त्यांना यशही आले. न्यायालयाने या शिक्षकांना सेवेत सामावून घेण्याचे आदेश दिले असताना शिक्षण उपसंचालकांनी एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीवरून या शिक्षकांना नियुक्ती व पगाराची मान्यता दिली नाही.

हा शिक्षकांवर होणारा अन्याय आपण कदापी सहन करणार नाही असे सावंत यांनी सांगत माध्यमिक शिक्षणाधिकारी कडूस यांना धारेवर धरले. गणपतीपूर्वी आवश्यक कार्यवाही करावी अन्यथा उपोषण छेडू असा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :zpजिल्हा परिषदsindhudurgसिंधुदुर्ग