शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: मतमोजणीला सुरूवात; सुरुवातीच्या कलांमध्ये NDA आघाडीवर
2
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावे उघड
3
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
4
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
5
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
6
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
7
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
8
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
9
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
10
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
11
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
12
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
13
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
14
डाॅक्टरसाहेब, मधुमेह होऊच नये, यासाठी काय करावे? चाळिशीनंतर करा नियमित तपासणी
15
आता झोपडीधारकाची संमती गरजेची नाही, झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी सलग ५० एकर क्षेत्रावर होणार समूह पुनर्विकास
16
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
17
यंदाचा कुंभमेळा पाच पट अधिक मोठा, ५,६५८ कोटींच्या कामांचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमिपूजन
18
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
19
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
20
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
Daily Top 2Weekly Top 5

गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर, जखमीवर बांबुळीत उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 16:06 IST

उपवडे-देऊळवाडी येथील सुभाष यशवंत शेडगे (६०) या शेतकऱ्यावर गव्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेडगे यांना गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. ही घटना रविवारी रात्री ७.४५ वाजण्याच्या सुमारास शेडगे यांच्या घरालगत असलेल्या रबर प्लँटेशननजीक घडली. या घटनेने उपवडे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्दे गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर, जखमीवर बांबुळीत उपचारउपवडे-देऊळवाडी येथील घटनेने परिसरात भीतीचे वातावरण

माणगांव : उपवडे-देऊळवाडी येथील सुभाष यशवंत शेडगे (६०) या शेतकऱ्यावर गव्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेडगे यांना गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. ही घटना रविवारी रात्री ७.४५ वाजण्याच्या सुमारास शेडगे यांच्या घरालगत असलेल्या रबर प्लँटेशननजीक घडली. या घटनेने उपवडे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.कुडाळ तालुक्यात माणगांव खोऱ्यातील उपवडे-देऊळवाडी येथे सुभाष शेडगे यांचे घर आहे. घराच्या सभोवताली जंगलमय भाग असल्याने जंगली प्राण्यांचा वावर नित्याचाच असतो. रविवारी रात्री सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करून शेडगे कुटुंबातील मंडळी घरी आली.

या दरम्यान कुत्रे भुंकू लागल्याने शेडगे लगत असलेल्या भातशेती व रबर प्लँटेशनच्या दिशेने गेले. यावेळी अचानक गव्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात शेडगे गंभीर जखमी झाले. आरडाओरड करीत त्याच स्थितीत त्यांनी कसेबसे घर गाठले. रक्ताने माखलेल्या शेडगे यांना स्थानिक ग्रामस्थांनी धावपळ करीत माणगांव आरोग्य केंद्रात दाखल केले. तिथून सावंतवाडी रुग्णालयात व त्यानंतर अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे हलविले.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गोवा-बांबोळी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तत्काळ उपचार सुरु केले. शेडगे यांच्या डाव्या बाजूकडील छातीच्या बरगड्या मोडल्या असून हातालासुध्दा गंभीर दुखापत झाली आहे. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.या घटनेची माहिती मिळताच उपवडे वनपाल हरी लाड, पोलीस पाटील जिजानंद शेडगे यांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र, शेडगे कुटुंबीयांपैकी घरी कुणी नसल्याने निश्चित घटनास्थळ समजू शकले नाही. कुडाळ वनक्षेत्रपाल अमृत शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीशी संपर्क साधला असून, मंगळवारी घटनास्थळी पंचनाम्याकरिता वनविभागाचे कर्मचारी जाणार आहेत. गोवा-बांबोळी येथे सुद्धा भेट देणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :wildlifeवन्यजीवsindhudurgसिंधुदुर्ग