शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, नंदकुमार घाटेंची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 15:54 IST

देवगड तालुक्यामध्ये गेले काही दिवस मुसळधार पाऊस पडल्यामुळे तालुक्यातील ९८ गावांपैकी ५८ गावांमधील १३० हेक्टर क्षेत्रातील भातशेतीचे नुकसान झाले आहे, अशी माहिती प्रभारी तालुका कृषी अधिकारी एच. एस. उल्पे यांनी दिली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, नंदकुमार घाटेंची मागणी तातडीने पंचनामे करावेत, भातशेतीचे नुकसान

देवगड : तालुक्यामध्ये गेले काही दिवस मुसळधार पाऊस पडल्यामुळे तालुक्यातील ९८ गावांपैकी ५८ गावांमधील १३० हेक्टर क्षेत्रातील भातशेतीचे नुकसान झाले आहे, अशी माहिती प्रभारी तालुका कृषी अधिकारी एच. एस. उल्पे यांनी दिली.

दरम्यान, तालुक्यात शेतीची दोन प्रकारात नुकसानी झाली असून त्याप्रमाणे नुकसानीचा सर्व्हे करावा अशी सूचना सभापती सुनील पारकर यांनी केली. तर तत्काळ नुकसानीची पाहणी करून, पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांनी केली.पंचायत समिती देवगडच्या सभापती दालनामध्ये तालुक्यातील भातशेती नुकसानीबाबत तालुका कृषी अधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी सभापती सुनील पारकर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, प्रभारी तालुका कृषी अधिकारी उल्पे, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष किंंजवडेकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रकाश गुरव, शरद शिंंदे आदी उपस्थित होते.तालुक्यात ४५०० हेक्टर क्षेत्रात भातशेती केली आहे. यावर्षी भातशेतीचे ५०० हेक्टर क्षेत्र वाढले आहे. कृषी सहाय्यकांमार्फत तालुक्यातील प्रत्येक गावात भातशेती नुकसानीचा सर्व्हे करून अहवाल घेतला असून ५८ गावांमधील १३० हेक्टर क्षेत्रातील भातशेतीचे नुकसान झाले आहे, अशी माहिती कृषी अधिकारी एच. एस. उल्पे यांनी दिली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकºयांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते नंदकुमार घाटे यांनी केली. 

टॅग्स :Farmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्ग