शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

हत्ती प्रश्नावरून दोडामार्गमधील शेतकरी आक्रमक; पोलिस-शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक 

By अनंत खं.जाधव | Updated: August 10, 2023 18:31 IST

अखेर मंत्री केसरकर यांच्याकडून मध्यस्थी

सावंतवाडी : दोडामार्ग तालुक्यात बागायतीचे नुकसान करणाऱ्या हत्तींचा कायमचा बंदोबस्त करा अन्यथा आम्हाला अधिकार द्या, अशी संतप्त मागणी करत गुरूवारी सावंतवाडीत आलेल्या शेतकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. जोपर्यंत आम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पत्र मिळत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही असे म्हणत वनविभाग कार्यालया समोर ठिय्या मांडला. अखेर सायंकाळी मंत्री दीपक केसरकर यांनी मध्यस्थी करत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून बैठक लावण्याचे आश्वासन घेत तसे लेखी पत्र उपवनसंरक्षक यांच्यामार्फत शेतकऱ्यांना दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.दोडामार्ग तालुक्यातील तब्बल दहा गावच्या ग्रामस्थांनी येथील वनविभागाच्या कार्यालयासमोर मोर्चा काढला. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, असे म्हणत सायंकाळी पाच वाजेपर्यंत येथील वनविभाग कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी वनविभागाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. उपवनसंरक्षक एस.एन. रेड्डी यांनी ग्रामस्थांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु आंदोलक आपल्या मागण्यावर ठाम होते.गेली २२ वर्षे हत्तींचा प्रश्न कायम आहे. आमच्या शेती बागायतींचे नुकसान होत आहे. नुकसान भरपाई ही तुटपुंजी आहे. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे आश्वासने नको, हत्तींचा कायमचा बंदोबस्त करा, तुम्हाला जमत नसेल तर आमचे संरक्षण आम्ही करू, अशी भूमिका घेत शेतकरी आक्रमक झाले होते. त्यातच पोलिस आणि शेतकरी यांच्यात जोरदार हमरीतुमरी झाली. अखेर पोलीस निरीक्षक त्रषिकेश अधिकारी यांनी मध्यस्थी करत यावेळी शेतकऱ्यांना शांत केले.माजी आमदार राजन तेली यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी शिंदे गटाचे पदाधिकारी ही तेथे आले आणि आपल्या दोघांनाही वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. त्यातच राजू निंबाळकर यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्याशी संपर्क केला. मंत्री केसरकर यांनी येत्या पंधरा दिवसांत बैठक लावली जाणार असून हत्ती हटाव मोहीम राबविण्यासाठी आसाम येथील पथक दोडामार्ग येथे येईल असे आश्वासन दिले व तसे पत्र उपवनसंरक्षक यांच्यामार्फत शेतकऱ्यांना दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, बबन राणे, निता कविटकर, एकनाथ नाडकर्णी, प्रमोनंद देसाई, सुधीर दळवी, पंकज गवस, विष्णू देसाई, रामकृष्ण मिरीकर, आदीसह शेतकरी सहभागी झाले होते.वनविभागाला पोलिस छावणीचे स्वरूप शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे वनविभागाला छावणीचे स्वरूप आले होते. पोलीस उपअधीक्षक संध्या गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक त्रषिकेश अधिकारी यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. तर सायंकाळी राज्य राखीव पोलिस दलाची कुमक बोलविण्यात आली होती.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गforest departmentवनविभागFarmerशेतकरीPoliceपोलिस