शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

हत्तीकडून शेतीचे नुकसान; कर्नाटकमधील तज्ञांची मदत घेणार, प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी दिली माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 12:41 IST

राज्य सरकारच्या माध्यमातून कर्नाटक मधील तज्ञांशी पत्रव्यवहार करण्यात येणार

सावंतवाडी : सिंधुदुर्गसह कोल्हापूर जिल्हयाला भेडसावणाऱ्या हत्ती प्रश्नावर आता पुन्हा एकदा वनविभाग कर्नाटक मधील हत्ती तज्ञांची मदत घेणार आहे. याबाबतची प्राथमिक चर्चा ही या तज्ञांशी झाली असल्याची माहिती नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक वायएलपी राव यांनी दिली.राव हे शुक्रवारी सिंधुदुर्गवनविभागाच्या आढावा बैठकीसाठी सावंतवाडीत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कोल्हापूर वनपरिक्षेत्राचे मुख्य वनसंरक्षक माणिकचंद रामानुजम, उपवनसंरक्षक एस.नवकिशोर रेड्डी, वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, अमृत शिंदे, एस.सोनवडेकर उपस्थित होते.राव म्हणाले, हत्तीकडून सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे. या नुकसानीमुळे दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त आहेत. यावर कायमस्वरूपी उपाय योजना आखण्याबाबत आमची चर्चा सुरू आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे मुख्य वनसंरक्षक माणिकचंद रामानुजम यांनी अलिकडेच कर्नाटक राज्यातील हत्ती तज्ञांशी चर्चा केली आहे. ही प्राथमिक चर्चा होती. पण लवकरच राज्य सरकारच्या माध्यमातून कर्नाटक मधील तज्ञांशी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. त्यानंतर एक अधिकाऱ्याचे पथक तिथे जाईल व हत्ती बाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी चर्चा करतील असे राव यांनी स्पष्ट केले.हत्तीसह वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीची भरपाई अत्यल्प आहे.या नुकसानीत वाढ व्हावी यासाठी राज्य शासनाकडे एक  प्रस्ताव पाठवण्यात आला असून या प्रस्तावाच्या आधारे भविष्यात नुकसान भरपाईत मोठी वाढ होईल. सध्या हा प्रस्ताव मंत्रालयीन पातळीवर असल्याचे राव यांनी सांगितले. मात्र यावर अद्याप निर्णय झाला नाही.सध्या मी राज्याचा दौरा करून जंगल क्षेत्रात काय बदल करायचे नवीन काय सुचना आहेत का यांची माहिती अधिकाऱ्यांकडून घेत आहे. त्याबाबतच चर्चा करण्यासाठी आलो होतो अधिकाऱ्यांकडून कामकाजाचा आढावाही घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गforest departmentवनविभागFarmerशेतकरी