शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : देवाचे झाड म्हणून प्रसिद्ध पिंपळ वृक्ष अंगणवाडीवर कोसळला, कुडासा-वानोशीतील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 16:50 IST

देवाचे झाड म्हणून प्रसिद्ध असलेला कुडासा-वानोशी येथील भला मोठा पिंपळ वृक्ष मंगळवारी रात्री अचानक मुळातून उखडून नजीकच्या सभागृह आणि अंगणवाडी इमारतीवर कोसळला. सुदैवाने तेथे कुणी नसल्याने जीवितहानी टळली. मात्र दोन्ही इमारतींचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

ठळक मुद्देदेवाचे झाड म्हणून प्रसिद्ध पिंपळ वृक्ष अंगणवाडीवर कोसळलाकुडासा-वानोशीतील घटना, सुदैवाने जीवितहानी टळली

दोडामार्ग : देवाचे झाड म्हणून प्रसिद्ध असलेला कुडासा-वानोशी येथील भला मोठा पिंपळ वृक्ष मंगळवारी रात्री अचानक मुळातून उखडून नजीकच्या सभागृह आणि अंगणवाडी इमारतीवर कोसळला. सुदैवाने तेथे कुणी नसल्याने जीवितहानी टळली. मात्र दोन्ही इमारतींचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.वानोशी येथे मणेरी-साटेली मुख्य रस्त्याच्या बाजूला मोठे सभागृह आहे. येथील ग्रामस्थांतर्फे येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम तसेच स्पर्धांचे आयोजन केले जाते. या घटनेपूर्वी येथे कबड्डी स्पर्धा खेळविल्या गेल्या होत्या.सुमारे ५० ते ६० फुटांपेक्षा जास्त उंचीचे पिंपळाचे झाड गेली अनेक वर्षे दिमाखाने उभे होते. झाडाभोवती कठडा बांधकाम करण्यात आले असून येथे धार्मिक कार्यक्रम व इतरवेळी या झाडाची पूजा केली जात होती. ह्यदेवाचे झाडह्ण अशी ओळख वानोशी गावात होती.मंगळवारी रात्री अचानक हा पिंपळ वृक्ष सभागृहावर कोसळला. प्रचंड मोठा आवाज आल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. सभागृहाचे खांब मोडून छपराचेही नुकसान झाले. लाकडी रिप, वासे मोडून लाखो रुपयांचे नुकसान झाले. झाडाचा काही भाग बाजूला असलेल्या अंगणवाडी इमारतीवर पडून तिचेही नुकसान झाले. झाडाच्या फांद्या रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. ग्रामस्थांनी फांद्या तोडून मार्ग मोकळा केला. दरम्यान, झाड पडूनदेखील सभागृहातील देवाची घुमटी व पारिजातकाचे झाड सुरक्षित राहिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.अनर्थ टळला; सभागृहाचे दीड लाखाचे नुकसानवानोशी येथील सभागृहात दिवसाच्या वेळी ग्रामस्थ गप्पागोष्टींसाठी बसतात. शिवाय अंगणवाडीतील मुलांचीही येथे ये-जा असते. मात्र रात्रीच्या वेळी झाड कोसळल्याने मोठा अनर्थ टळला. सभागृहाचा निम्मा भाग जमीनदोस्त झाला असून दीड लाखाच्यावर नुकसान झाले आहे. याबाबतची माहिती ग्रामपंचायत सदस्य अजय परब यांनी महसूल प्रशासनाला दिली. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गenvironmentवातावरण