माकडतापामुळे मृत्यूमुखी पडलेल्या आठ जणांच्या कुटूंबाना प्रत्येकी दोन लाखाची मदत
By Admin | Updated: April 11, 2017 15:51 IST2017-04-11T15:51:47+5:302017-04-11T15:51:47+5:30
केसरकर यांची माहिती : लवकरच स्वतंत्र केंद्र स्थापणार

माकडतापामुळे मृत्यूमुखी पडलेल्या आठ जणांच्या कुटूंबाना प्रत्येकी दोन लाखाची मदत
आॅनलाईन लोकमत
सिंधुदुर्गनगरी, दि. ११ : माकडतापाने मृत्यूमुखी पडलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ जणांच्या कुटूंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी दिली.
सिंधुदुर्गनगरीतील ओरोस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केसरकर यांनी ही माहिती दिली. माकडताप उपचारासाठी सिंधुदुर्गात लवकरच स्वतंत्र केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
जिल्हा मुख्यालयात असलेल्या समस्यांची यावेळी केसरकर यांनी दखल घेतली. गुरुवार, दि. १३ एप्रिल रोजी संपूर्ण सिंधुदुर्गनगरीची आपण पाहणी करणार असून त्यानंतर दुपारी १२ वाजता नियोजन समितीच्या सभागृहात कर्मचारी आणि नागरिकांची बैठक घेणार असल्याचे केसरकर यांनी यावेळी सांगितले. यावेळी सिंधुदुर्गनगरीवासीयांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.