शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडीत मुसळधार पावसामुळे पडझडीच्या घटना; आपत्कालीन यंत्रणा सतर्क, पंचनाम्यास सुरूवात

By अनंत खं.जाधव | Updated: July 8, 2024 17:22 IST

दाणोली बांदा रस्त्यावर दरड कोसळली

सावंतवाडी : तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे पडझडीचे सत्र सुरूच असून आपत्कालीन यंत्रणाही आता सतर्क झाली आहे. नुकसानीचे पंचनामे आता तातडीने केले जात आहेत. दरम्यान, काल, रविवार सकाळपासून तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे.तालुक्यासह जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडून नुकसानीचे सत्र सुरू आहे. याचबरोबर रस्त्यावर झाडे कोसळून वाहतूक खोळंबण्याचे प्रकार घडत आहेत. पावसाबरोबरच सोसाट्याचा वारा सुटल्याने झाडे उन्मळून पडली आहेत. माडखोल येथे नदीची पाणी पातळी वाढली आहे. तळवडे होडावडे पुलावर वरून पाणी वाहण्यास सुरुवात झाली होती. मात्र आता पाणी पुलावरून ओसरले आहे. तर तळवणे माऊली टेम येथे सुनील पुरुषोत्तम परांजपे व कृष्णा भिकू रेडकर यांच्या पडवीत पाणी गेले होते. यासह निरवडे कोंडुरा मळेवाड सोनुर्ली वेत्ये मळगाव माझगाव आदी गावातील छोटी मोठी पुले पाण्याखाली गेली होती.तर शेतकऱ्यांची शेती सुद्धा पाण्याखाली गेली होती. बावळाट येथे गोपाळ यशवंत परब यांच्या घरावर फणसाचे झाड पडून सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आंबोली येथील हनुमंत नवलू पाटील यांची म्हैस पाण्यात बुडून मृत्यू झाली आहे. नेमळे येथे पाटकर वाडी येथे ग्रामपंचायतच्या नळपाणी योजनेचे नुकसान झाले आहे. सावंतवाडी शहरात सलाउद्दीन गुलाब तहसीलदार यांच्या गडग्यांचे सुमारे तीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सावंतवाडी सालईवाडा गुंडू केशव आईर यांच्या गाडीवर भिंत पडून नुकसान झाले आहे. दाणोली बांदा रस्त्यावर दरड कोसळलीमुसळधार पावसाने दाणोली बांदा मार्गावरील दरड कोसळली असून वाहतूक ठप्प झाली होती. अखेर बांधकाम विभागाकडून ही दरड हटविण्यात आली असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊसSawantwadiसावंतवाडी