शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडझडीचे सत्र सुरुच; काही गावे अंधारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 17:38 IST

पाच तालुक्यात शंभरी पार पाऊस: नागरिकांना मोठा फटका, प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी पावसाचा जोर कायम होता. वारा आणि मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीचे सत्र कायम असून दिवसभर मुसळधार पावसाची संततधार कायम होती. करूळ घाटात सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प होती. मात्र, त्यानंतर दरड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. जिल्ह्यातील ऑरेंज अलर्ट कायम असून शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या  २४ तासात ९९.५ च्या सरासरीने ७९६  मिलिमीटर पाऊस पडला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात शुक्रवारी मुसळधार पावसाचा जोर कायम होता. वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी इमारत, गोठे, संरक्षक भिंत, दुकान आदींची पडझड होत आहे. करूळ, गगनबावडा, आंबोली या घाटात दरड कोसळल्याने  काही वेळ वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडला आहे. पोलिस व सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड हटवून घाट वाहतुकीस सुरळीत केले आहेत.मुसळधार पावसामुळे काही भागात खंडित झालेली वीज अद्यापही सुरळीत झालेली नाही. त्या त्याठिकाणी महावितरणमार्फत प्रयत्न केले जात आहेत. हवामान खात्याने इशारा दिल्यानुसार जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम असून अधून-मधून मुसळधार पावसाच्या सरी  कोसळत आहेत. वादळी वाऱ्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात न जाता काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक पाऊसशुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या  २४ तासात वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक १६७ मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्या पाठोपाठ कुडाळ आणि कणकवली तालुक्यात पाऊस झाला आहे.

पाच तालुक्यात शंभरी पार पाऊसमालवण, दोडामार्ग आणि वैभववाडी तालुका वगळता अन्य पाच तालुक्यात  शंभर मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. उन्हाळ्याच्या कालावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच इतका पाऊस झाला आहे.

कणकवली - आचरा रस्ता बंदकणकवली : कणकवली ते  आचरा मार्गावरील वरवडे पुलाचे काम अपूर्ण राहिल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी ठप्प झाला आहे. कणकवली ते आचरा आणि आचरा ते कणकवली येथे येण्यासाठी कलमठ, कुंभारवाडीमार्गे वाहनचालकांना जावे लागणार आहे. त्यासाठी वाहन चालकांना चार किलोमीटरचा वळसा घालावा लागणार आहे.यंदा पावसाळ्यापूर्वी वरवडे येथील नदीवरील पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, हे काम अपूर्ण स्थितीत राहिले आहे. गेले सहा महिने वरवडे येथील जुना पूल तोडून तेथे नवीन पुलाची उभारणी केली जात होती. त्यासाठी नदीपात्रातून रस्ता काढण्यात आला होता. गेले काही दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे हा रस्ता पाण्याखाली गेला आहे. वरवडे पूल अपूर्ण असल्याने वाहतुकीचा मार्ग बंद झाल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस