शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
2
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर होतील हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या; ८ डिसेंबरपासून अधिवेशनाला सुरवात
3
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
4
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
5
IND VS SA 3rd ODI : कुलदीप यादवसह प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! दक्षिण आफ्रिकेचा संघ २७० धावांत आटोपला
6
Aaditya Thackeray : "साधुग्राम, तपोवन हवा पण भाजपाच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
7
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
8
महामानवाला अभिवादन! CM फडणवीसांनी केली सरणत्तयं प्रार्थना; PM मोदींनीही वाहिली आदरांजली
9
America Visa : सोशल मीडियावर एक चूक कराल, तर तुमच्यासाठी बंद होतील अमेरिकेचे दरवाजे! काय आहे नियम?
10
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
11
Video - "मी नवरदेव आहे, पण स्वतःच्या लग्नालाच..."; इंडिगोमुळे अडकले प्रवासी, मांडली व्यथा
12
"आमच्या बॅगा कुठायत? घराची चावी त्यात आहे, भिकारी वाटलो का..."; मुंबई एअरपोर्टवर तुफान राडा
13
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
14
२०२५ ची शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ उपाय अवश्य करा, चिंतामुक्त व्हा; बाप्पाची अपार कृपा लाभेल!
15
'रुपयाबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही..,' घसरत्या चलनावर निर्मला सीतारमण काय म्हणाल्या?
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: विशेष व्रत करा; वर्षभर पुण्य-लाभ, विनायक कल्याण-मंगल करेल!
17
हुमायूं कबीर यांनी मुर्शिदाबादमध्ये केली बाबरी मशिदीची पायाभरणी, भाजपा-तृणमूलचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप  
18
IND vs SA : जड्डूच्या गोलंदाजीवर फसला बावुमा! कॅच घेतल्यावर कोहलीनं अशी घेतली मजा (VIDEO)
19
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; कॅन्सरसह 'या' आजारांचा धोका, आताच बदला सवय
20
अमेरिका सोडून भारतात परत का आली माधुरी दीक्षित? म्हणाली, "बऱ्याच गोष्टी घडल्या..."
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडीतील बनावट मनी लाँड्रिंगचे धागेदोरे देशभरात, मुंबईतून दोघे ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 16:10 IST

ज्येष्ठ नागरिकाला मनी लाँड्रिंगच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत तब्बल ९७ लाख रुपयांचा गंडा घातला; पंजाब, दिल्ली, आसाम येथील काही आरोपींचा समावेश

सावंतवाडी : मुंबई क्राइम ब्रँच अधिकारी असल्याचे भासवून एका अज्ञात सायबर गुन्हेगाराने एका ज्येष्ठ नागरिकाला मनी लाँड्रिंगच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत तब्बल ९७ लाख रुपयांचा गंडा घातला होता. या घटनेनंतर सायबर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत तपास करत मुंबई येथून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.दरम्यान, सायबर पोलिसांकडून जो तपास करण्यात आला त्यात या घटनेची पाळेमुळे संपूर्ण भारतात पसरली असल्याचे निष्पन्न झाले. पंजाब, दिल्ली, आसाम येथील काही आरोपींचा यात समावेश आहे, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.या घटनेची पाळेमुळे संपूर्ण भारतात पसरली असून सायबर पोलिसांच्या कल्पकतेने दहा लाख रुपये वसूल करण्यात यश आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये विष्णू बांदेकर (वय ५७, रा. अंधेरी, मुंबई), तर समशेर खान (रा. मुंबई) यांचा समावेश आहे.सावंतवाडीमधील अज्ञात पीडित ज्येष्ठ नागरिकाला व्हाॅट्सॲप व्हिडीओ कॉल करून मुंबई क्राइम ब्रँच अधिकारी असल्याची बतावणी करत, तुमच्या खात्यातून २५ लाखांचा व्यवहार मनी लाँड्रिंगशी संबंधित आहे. त्वरित मुंबईत या किंवा आम्ही सांगतो तशी ऑनलाइन चौकशीला सामोरे जावा, अशा धमक्या देऊन त्यांना मानसिक दडपण आणले.कायदेशीर अडचणीत सापडण्याची भीती मनात आल्याने पीडिताने आपली दामदुप्पट योजनेतून तसेच म्युच्युअल फंड आणि शेअर्समधील सुमारे ९७ लाख रुपये आरटीजीएस प्रणालीद्वारे संशयिताच्या बँक खात्यावर ऑनलाइन ट्रान्सफर केले आणि ते सायबर शिकारीचे बळी ठरले होते. मात्र, नंतर सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला असता त्यांनी थेट पोलिस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला.

English
हिंदी सारांश
Web Title : Sawantwadi Money Laundering Scam: Nationwide Links, Two Arrested in Mumbai

Web Summary : A Sawantwadi senior citizen lost ₹97 lakhs in a money laundering scam. Cyber police traced the network nationwide, arresting two from Mumbai. The scam involved threats via WhatsApp video calls, with victims pressured to transfer funds. Police recovered ₹10 lakhs.