वीजबिल भरण्यासाठी सुविधा देणार  : विनोद पाटील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 06:09 PM2021-02-24T18:09:06+5:302021-02-24T18:11:18+5:30

mahavitaran Sindhudurg news- जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना वीजबिल भरण्यासाठी तीन हप्त्यांची सुविधा, तर सर्वसामान्य गरीब जनतेला तीन ते चार हप्त्यांची सुविधा दिली जाईल, असे आश्वासन महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी जिल्हा व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळास दिले.

Facilitate payment of electricity bills: Vinod Patil | वीजबिल भरण्यासाठी सुविधा देणार  : विनोद पाटील 

वीजबिलांच्या प्रश्नी जिल्हा व्यापारी महासंघ, हॉटेल, लॉजिंग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांची भेट घेत निवेदन सादर केले.

Next
ठळक मुद्दे वीजबिल भरण्यासाठी सुविधा देणार : विनोद पाटील  जिल्हा व्यापारी संघटनेने घेतली भेट

मालवण : जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना वीजबिल भरण्यासाठी तीन हप्त्यांची सुविधा, तर सर्वसामान्य गरीब जनतेला तीन ते चार हप्त्यांची सुविधा दिली जाईल, असे आश्वासन महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी जिल्हा व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळास दिले.

जिल्हा व्यापारी महासंघ, कुडाळ तालुका व्यापारी संघ, जिल्हा हॉटेल, लॉजिंग संघटना पदाधिकाऱ्यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांची भेट घेत वीजबिलप्रश्नी निवेदन सादर केले.

यावेळी व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे, माजी जिल्हाध्यक्ष नितीन वाळके, अरविंद नेवाळकर, द्वारकानाथ घुर्ये, कुडाळ व्यापारी संघाचे तालुकाध्यक्ष श्रीराम शिरसाट, उपाध्यक्ष गोविंद सावंत, व्यापारी महासंघाचे नवनियुक्त प्रतिनिधी संजय भोगटे, जिल्हा हॉटेल, लॉजिंग संघटनेचे अध्यक्ष राजन नाईक यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी झालेल्या चर्चेत अधीक्षक अभियंता पाटील यांनी व्यापाऱ्यांनी सादर केलेले निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविले जाईल. यात आपल्या अधिकारात व्यापाऱ्यांना थकीत वीजबिल भरण्यासाठी दोन, तीन हप्त्यांची सुविधा देऊ. जे हप्त्याने वीजबिले भरतील, त्यांची वीजजोडणी तोडण्यात येणार नाही. गरीब जनतेला तीन ते चार हप्त्यांत वीजबिले भरण्याची सुविधा देऊ, असे आश्वासन पाटील यांनी दिल्याचे तायशेटे यांनी यावेळी सांगितले.

हप्ते ठरवून द्यावेत

यावेळी वीजबिलांबाबत जिल्ह्यातील वीजग्राहकांच्या समस्या मांडण्यात आल्या. यात प्रामुख्याने लॉकडाऊन काळातील एप्रिल ते सप्टेंबरपर्यंतच्या वीजबिलांमध्ये आकारलेले अवास्तव आकार, इंधन समायोजन, वहन, व्याज, स्थिर आकार याला माफी देण्यात यावी. सप्टेंबरनंतरची सर्व बिले भरून घ्यावीत. वीजबिल भरण्यासाठी हप्ते ठरवून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली.

Web Title: Facilitate payment of electricity bills: Vinod Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.