शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

संसार उद्ध्वस्त झाल्याने डोळे पाणावले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 16:36 IST

Tauktae Cyclone Sindhudurg : कणकवली तालुक्यात 'तौक्ते ' वादळाने व पावसाने अनेक ग्रामस्थांची अगदी दाणादाण उडवून दिली आहे. घरे, गुरांचे गोठे, शाळा, शेड, फळ झाडे, बागायती यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी तसेच अनेक ग्रामस्थ उध्वस्त झाले आहेत. कोरोनाच्या फटक्याने अनेक ग्रामस्थ आर्थिक संकटात सापडले होते. त्यातच वादळाने झालेले नुकसान पाहून ग्रामस्थांचे डोळे पाणावत आहेत.

ठळक मुद्देसंसार उद्ध्वस्त झाल्याने डोळे पाणावले ! कणकवली तालुक्यात तौक्ते वादळाने मोठे नुकसान

सुधीर राणेकणकवली : कणकवली तालुक्यात 'तौक्ते ' वादळाने व पावसाने अनेक ग्रामस्थांची अगदी दाणादाण उडवून दिली आहे. घरे, गुरांचे गोठे, शाळा, शेड, फळ झाडे, बागायती यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी तसेच अनेक ग्रामस्थ उध्वस्त झाले आहेत. कोरोनाच्या फटक्याने अनेक ग्रामस्थ आर्थिक संकटात सापडले होते. त्यातच वादळाने झालेले नुकसान पाहून ग्रामस्थांचे डोळे पाणावत आहेत.तौक्ते वादळाने कणकवली तालुक्यात धुमाकूळ घातला. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने सर्वानाच हैराण करून सोडले. काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले. सह्याद्री पट्ट्यातील गावांमधिल अनेक घरांची छपरे पत्याप्रमाणे उडून गेली. नारळ, आंबा, काजू यांची झाडे उन्मळून पडली तर काही झाडांच्या फांद्या तुटून पडल्या आहेत. हापूस आंब्याचेही नुकसान झाले.शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास या चक्रीवादळात फळ बागांचे नुकसान झाल्याने हिरावून घेतला गेला आहे.घरांच्या छपरांची कौले, सिमेंटचे व लोखंडी पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. गुरांच्या गोठयांचीही हानी झाली आहे. विजेच्या खांबांवर झाडे तुटून पडल्याने अनेक खांब मोडून पडले होते. तर अनेक ठिकाणी वीज वाहिन्या तुटून पडल्याने वीज प्रवाह खंडीत झाला होता. अकरा दिवसांच्या विशेष प्रयत्नातून महावितरणला वीज प्रवाह सुरळीत करण्यात यश आले आहे.या वादळाच्या पार्श्वभूमीवर शासनाने नुकसान झालेल्याना भरघोस भरपाई देण्याची मागणी अनेक राजकीय पक्षांनी लावून धरली आहे. ग्रामसेवक, तलाठी , कोतवाल, पोलीस पाटील , मंडळ अधिकारी आदी महसुलचे कर्मचारी यांनी तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष भेट देत नुकसानीची पाहणी करून पंचयादी घातली आहे. त्याचा अहवाल वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात आला आहे.खासदार, आमदार, पालकमंत्री व अन्य नेत्यांनी तालुक्यातील नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. मात्र, शासनाकडून जाहीर झालेली नुकसान भरपाई प्रत्यक्षात कधी मिळणार ? याकडे नुकसानग्रस्तांचे लक्ष लागून राहिले आहे. नुकसान भरपाईची ते अगदी चातका प्रमाणे वाट बघत असल्याचे सध्याचे चित्र आहे.घरांची डागडुजी करण्यासाठी अनेकाना आर्थिक मदतीची गरज असून आता कर्जासाठी बँकांचे दरवाजे ठोठावण्याशिवाय पर्याय राहिला नसल्याचे काही नुकसानग्रस्तांनी सांगितले. सरकारची मदत मिळेपर्यंत आमचे घर नादुरुस्त स्थितीत ठेवू शकत नाही. पावसाळा जवळ आल्याने त्याची त्वरित डागडुजी करणे आवश्यक असल्याचे अनेकांनी सांगितले.निसर्गाच्या या दणक्याने शेतकरी व ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. कणकवली तालुक्‍यातील नुकसानीचा आकडा तीन कोटींच्या घरात पोहचला आहे. मात्र, सरकारकडून नुकसान भरपाई मिळताना शेतकऱ्यांना अनेक प्रशासकीय अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणार आहे.

नुकसानीच्या पंचनाम्या सोबत जमिनीचा सातबारा व अन्य कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.त्यामुळे ते चिंतीत आहेत. तालुक्यातील साकेडी, कलमठ, भिरवंडे,नाटळ, नरडवे,वाघेरी,फोंडाघाट आदी परिसरात झालेल्या नुकसानीमुळे ग्रामस्थांच्या डोळ्यात अश्रू तराळत आहेत.

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग