शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

हातपंप दुरुस्ती कामगारांना जिल्हा परिषद सेवेत सामावून घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 13:25 IST

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत कार्यरत असलेल्या ९ हातपंप दुरुस्ती कामगारांना (मैकेनिकला) जिल्हा परिषद सेवेत सामावून घेण्याचा निर्णय कामगार न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे या ९ कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद सेवेत सामावून घेण्याबाबतचा प्रस्ताव ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने तयार केला असून याला आजच्या सभेत मान्यता देण्यात आली. हा प्रस्ताव ११ जुलै रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत अंतिम मान्यतेसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती आजच्या जल व्यवस्थापन समिती सभेत देण्यात आली. त्यामुळे या ९ हातपंप दुरुस्ती कामगारांना कायमस्वरूपी दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देजलव्यवस्थान समिती सभेत माहिती न्यायालयाच्या निर्णयामुळे कामगारांना दिलासा

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गजिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत कार्यरत असलेल्या ९ हातपंप दुरुस्ती कामगारांना (मैकेनिकला) जिल्हा परिषद सेवेत सामावून घेण्याचा निर्णय कामगार न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे या ९ कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद सेवेत सामावून घेण्याबाबतचा प्रस्ताव ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने तयार केला असून याला आजच्या सभेत मान्यता देण्यात आली. हा प्रस्ताव ११ जुलै रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत अंतिम मान्यतेसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती आजच्या जल व्यवस्थापन समिती सभेत देण्यात आली. त्यामुळे या ९ हातपंप दुरुस्ती कामगारांना कायमस्वरूपी दिलासा मिळाला आहे.जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची मासिक सभा येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात अध्यक्षा संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली.  यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हरीश जगताप, उपाध्यक्ष रणजीत देसाई, विषय समिती सभापती जेरॉन फर्नांडिस, डॉ. अनीषा दळवी, पल्लवी राऊळ, सदस्य मायकल डिसोजा, उत्तम पांढरे, सावी लोके, सरोज परब, श्वेता कोरगावकर, स्वीकृत सदस्य प्रमोद कामत, विकास कुडाळकर, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुहास सावंत, अधिकारी खातेप्रमुख आदि उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९४८ हातपंप आहेत. या हातपंपाची दुरुस्ती गेले अनेक वर्षे ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत कार्यरत असलेल्या हातपंप दुरुस्ती कामगारांमार्फत केली जाते. या कामगारांना कामाच्या प्रमाणात मोबदला दिला जातो. मात्र गेली अनेक वर्षे जिल्हा परिषदेला सेवा देणाऱ्या या कामगारांनी आपल्याला सेवेत सामावून घेण्यात यावे असे अपील कामगार न्यायालयात केले होते. यावर या हातपंप दुरुस्ती कामगारांना सेवेत सामावून घेण्यात यावे असे आदेश कामगार न्यायालयाने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला दिले आहेत.

टॅग्स :zpजिल्हा परिषदsindhudurgसिंधुदुर्ग