चिपळूण स्टेशनवर एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळावा

By Admin | Updated: January 6, 2015 00:45 IST2015-01-05T22:49:56+5:302015-01-06T00:45:09+5:30

सुरेश प्रभू यांना निवेदन : अन्याय निवारण समितीची मागणी

Express trains stop at Chiplun station | चिपळूण स्टेशनवर एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळावा

चिपळूण स्टेशनवर एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळावा

चिपळूण : येथील रेल्वेस्थानकावर सर्व १४ एक्स्प्रेस व सुपरफास्ट गाड्यांना थांबा मिळावा, अशी मागणी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना पत्र देऊन करण्यात आली आहे. चिपळूण रेल्वेस्थानकावर एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळण्याबाबत अनेक निवेदने पाठविण्यात आली. परंतु, रेल्वे मंत्रालयाने त्यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही. २२ जून २०११ रोजी चिपळूण रेल्वे स्टेशन येथे कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीतर्फे रेलरोको करण्यात आला. यावेळी कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी येथे सर्व गाड्या थांबविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अनेक वर्षे उलटूनही या मागणीकडे दुर्लक्ष झाले आहे.
चिपळूण शहर हे गतिमान असून, शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. कोकणातील हे मध्यवर्ती शहर असल्याने येथे येणाऱ्या लोकांची संख्याही जास्त असते. पाणी व डिझेल भरण्याची व्यवस्था येथे असून, आरक्षणाची सुविधा आहे. ६ लाईन ट्रॅक सुविधा असूनही येथे १४ एक्स्पे्रस गाड्यांना थांबा नाही. हा कोकणच्या जनतेवरील अन्याय आहे. येथे सर्वच थांबा मिळावा, अशी मागणी या करण्यात आली आहे. चिपळुणातील प्रवाशांच्या अनेक मागण्या आहेत. त्यात कोकणसाठी नवीन लोकल गाड्यांचाही समावेश आहे. कित्येक महिन्यांपासून मागणी असलेली लोकलची अजून प्रतीक्षा आहे.
या मार्गावरून धावणाऱ्या सर्व एक्स्पे्रस पनवेलनंतर रत्नागिरीला थांबतात. पनवेल ते चिपळूण २५६ किलोमीटर अंतर, तर चिपळूण ते रत्नागिरी अंतर १०६ किलोमीटर आहे. एक्स्प्रेसमधील प्रवासी पनवेलनंतर थेट रत्नागिरीत उतरतो. या ३६२ किलोमीटरच्या अंतरात राहणाऱ्या लोकांना याचा लाभ होत नाही. चिपळूण येथे पाणी व डिझेल भरण्यासाठी एक्स्प्रेस थांबविल्या जातात. परंतु, प्रवाशांसाठी थांबविल्या जात नसल्याने तीव्र असंतोष पसरला आहे. (प्1ा्रतिनिधी)

Web Title: Express trains stop at Chiplun station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.