शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

माजी नगराध्यक्षांवर निशाणा

By admin | Updated: November 7, 2015 22:40 IST

कणकवली नगरपंचायत बैठक : राजकीय बदलाचे उमटले पडसाद

कणकवली : नगरपंचायतमधील बदलेल्या समीकरणामागील राजकारणाचे पडसाद अपेक्षेप्रमाणे शनिवारी नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत उमटले. विविध मुद्यांवरून माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. प्रज्ञा खोत यांना विरोधकांकडून लक्ष्य करण्यात आले. नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष माधुरी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, मुख्याधिकारी अवधूत तावडे उपस्थित होते. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष बदलल्यानंतर ही पहिलीच सभा होती. या सभेत रस्त्यांच्या कामांवरून अ‍ॅड. खोत यांना लक्ष्य करण्यात आले. अ‍ॅड. खोत यांनी रस्त्याची कामे जाणीवपूर्वक अडवून ठेवल्याचा आरोप अभि मुसळे, समीर नलावडे यांनी केला. तर अ‍ॅड. खोत यांनी ई-टेंडरिंग प्रक्रियेत तांत्रिक कारणास्तव रस्त्यांची कामे रखडल्याचे सांगितले. नव्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांनी रस्ते अनुदानपोटी जमा झालेला निधी प्रामाणिकपणे खर्च करा व शहरनिष्ठा दाखवा, असे समीर नलावडे यांनी सांगितले. सेवकाची भूमिका असेल तर सहकार्य करू, वैयक्तिक छबी उजळण्याचा प्रयत्न केल्यास कामे होणार नाहीत, असे बंडु हर्णे म्हणाले. तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही गट पाडण्यात यशस्वी झालात, असा आरोप अ‍ॅड. खोत यांनी बंडू हर्णे यांच्यावर केला असता त्यामुळेच तुमच्या इच्छेप्रमाणे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडले गेल्याचा टोला हाणला. खडाजंगीमध्ये बांधकाम सभापती रूपेश नार्वेकर यांनी असभ्य शब्द वापरल्याबद्दल विरोधकांनी माफी मागण्याची जोरदार मागणी केली. लिंगायत स्मशानभूमीचा आराखडा ५६ लाखावरून २८ लाखांवर आला. या आराखड्यात कोणते बदल करण्यात आले ते सांगावे, अशी मागणी अभि मुसळे यांनी केली. शहरात लावण्यात येत असलेल्या होर्डिंग्जचे शुल्क आकारण्याबाबत धोरण ठरवले जावे. फलक लावणाऱ्यांकडूनच ते काढले जावेत, अन्यथा नगरपंचायतीचे मनुष्यबळ वापरले जाते, अशी समीर नलावडे यांनी सूचना केली. विकासकामांची ई निविदा प्रक्रिया करून एजन्सी नेमण्याबाबत चर्चा करताना याबाबत निकष कोणते आहेत. एजन्सीची परिभाषा कोणती? असे प्रश्न अभि मुसळे यांनी उपस्थित केले. पथदीप व दुभाजक यांचे रंगकाम करण्यात येणार आहे. मात्र, महामार्गाचे काम लवकरच होणार असेल तर रंगकाम केले जाऊ नये, अशी सूचना बंडु हर्णे यांनी मांडली. तर यापूर्वी करण्यात आलेले रंगकाम पंधरा दिवसांतच वाया गेल्याचे अ‍ॅड. खोत यांनी सांगितले. मराठा मंडळ येथील केटी बंधाऱ्यावरून अवजड वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी कमान उभारली जाणार आहे. यासंदर्भात बॅँकांना कमान उभारण्यास सांगण्यात आले असल्याचे अ‍ॅड. खोत म्हणाल्या. तर संबंधित खात्याकडून हे काम करून घेतल्यास नगरपंचायतीचा निधी वाचेल, असे किशोर राणे यांनी सूचना केली. कमान कोणी केली नाही तर नगरपंचायत उभारेल, असे उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर म्हणाले. आरोग्य विभागासाठी ग्रास कटर मशिन व फोगिंग मशिन देखभालीचा खर्च जास्त येत असल्याने खरेदी करण्याबाबत पुनर्विचार करावा, अशी सूचना अ‍ॅड. खोत यांनी केली. तर शहरासाठी ही खरेदी आवश्यकच असल्याचे अभि मुसळे, समीर नलावडे यांनी सांगितले. अंध व अपंग निधीतून शिल्लक निधी राहतो. त्यामुळे अंध-अपंगांची यादी करून शिल्लक निधीतून प्रतिवर्षी मानधन दिले जावे, अशी सूचना बंडु हर्णे यांनी केली. शहरात प्लास्टिकबंदी करण्याबाबत जनजागृती केली जाईल. तसेच व्यापाऱ्यांची बैठक घेऊन कारवाईचे धोरण निश्चित केले जाईल, असे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी सांगितले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेतला जावा. वेंगुर्ले नगरपरिषदेप्रमाणे कठोर कारवाई करून शहरात स्वच्छता राखण्याचा प्रयत्न व्हावा, अशी सूचना राजश्री धुमाळे यांनी केली. त्याला सर्व सदस्यांनी अनुमोदन दिले. (प्रतिनिधी)  

राजकारणाची खिचडी : भाजी मार्केट पूर्ण जागेत व्हावे ४नगरपंचायतीमध्ये बदललेल्या समीकरणाने राजकारणाची खिचडी झाल्याचे पहावयास मिळत आहे. कॉँग्रेसचे काही नगरसेवक विरोधी बाकावर तर काही सत्ताधारी बाकावर आहेत. समीर नलावडे यांनी उपनगराध्यक्ष पारकर यांना तुम्ही पद मिळण्यापूर्वी माजी नगराध्यक्षांबाबत आरोप करत होता, अशी टीका केली. मागील अडीच वर्षांच्या सत्ताकाळात शहरवासीयांना स्वप्ने दाखवण्यात आली, ही नार्वेकर यांनी केलेली टीका आता त्यांच्यासोबत असलेल्या अ‍ॅड.खोत यांच्यावरच असल्याचा टोला बंडु हर्णे यांनी लावला. तर राजश्री धुमाळे यांनी गैरकारभार दिसल्यास विरोधात राहणार असल्याचे ठणकावले. ४आरक्षण क्रमांक ५ मध्ये भाजी मार्केट इमारत बांधकाम करण्यात येणार आहे. नगरपंचायतीच्या ताब्यात असलेल्या ७ गुंठे जागेत विकास केल्यास खाजगी जमीन मालकांची ३४ गुंठे जागा फुकट जाणार आहे. त्यापेक्षा सर्व जागा ताब्यात घेऊन मच्छिमार्केट विकास करावा, अशी सूचना बंडु हर्णे यांनी केली.