शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
3
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
5
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
6
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
7
IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!
8
"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला
9
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
10
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
11
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
12
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
13
दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?
14
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
15
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
16
IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय!
17
'मलाही अनेकदा भाजपची ऑफर दिली गेली'; प्रणिती शिंदेंचं विधान, काँग्रेसची सत्ता न येण्याचं सांगितलं कारण
18
२०२५ पेक्षा २०२६ असेल अधिक भयंकर, युद्ध, भूकंप, महापूर, होणार प्रचंड विध्वंस, उत्पन्नाची साधनं संपणार
19
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...

आयसीटीतून विनाअनुदानित शिक्षकांना वगळले

By admin | Updated: January 25, 2015 00:49 IST

शाळांमधून नाराजीचा सूर : मार्चमध्ये होणाऱ्या प्रशिक्षणासाठी समाविष्ट करण्याची मागणी

शिवापूर : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, ओरोस व माध्यमिक शिक्षण विभाग, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने नववी व दहावीला शिकविणाऱ्या शिक्षकांना देण्यात येणाऱ्या आयसीटी प्रशिक्षणातून विनाअनुदानित शिक्षकांना वगळण्यात आल्याने शिक्षण विभाग व शिक्षण, प्रशिक्षण संस्थेबाबत विनाअनुदानित शाळांमधून नाराजी व्यक्त होत आहे. २० जानेवारी २०१५ ते २४ जानेवारी २०१५ तसेच २७ मार्च २०१५ ते ३१ मार्च २०१५ अशा पाच दिवसांच्या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील नववी व दहावी विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या व ब्रिटिश कौन्सिलचे प्रशिक्षण केलेल्या शिक्षकांना सोडून उर्वरित शिक्षकांना सध्या सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक व प्रशिक्षण संस्था व माध्यमिक शिक्षण विभाग सिंधुदुर्गच्या संयुक्त विद्यमाने आयसीटीचे प्रशिक्षण देण्याचे काम जिल्ह्यात सुरू आहे. सध्या दहावीची २०१४-१५ ची पूर्व परीक्षा सुरू असल्याने प्रशिक्षणाला तसा अल्प प्रतिसाद मिळत आहे. परंतु, उपस्थित शिक्षकांना योग्य प्रकारे प्रशिक्षण सुरू आहे. शिक्षकांमधून योग्य प्रकारे प्रशिक्षण सुरू असून, शिक्षकांमधून समाधान व्यक्त होत आहे. परंतु विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना या प्रशिक्षणामध्ये सामावून न घेतल्याने त्यांच्यात या भेदभावाबाबत नाराजी पसरली आहे. विनाअनुदानित शाळांमध्ये नववी, दहावीचे वर्ग आहेत व त्यांनासुध्दा आयसीटी विषय आहे. त्यामुळे शिक्षण विभाग व जिल्हा शिक्षण-प्रशिक्षण संस्था, सिंधुदुर्ग यांनी २७ मार्च २०१५ ते ३१ मार्च २०१५ या दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षक विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांना सामावून घ्यावे. तसे न केल्यास या शाळेतील विद्यार्थ्यांवर अन्याय होईल. गुरुनाथ पेडणेकर यांनी विनाअनुदानित शिक्षकांच्या तसेच शाळांच्या समस्येकडे लक्ष देऊन दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या आयसीटी प्रशिक्षणात विनाअनुदानित शिक्षकांना सहभागी करून घ्यावे, अशी मागणी शिक्षकवर्गातून होत आहे. (वार्ताहर)