आकारीपड प्रश्न हद्दपार करा
By Admin | Updated: August 14, 2014 22:38 IST2014-08-14T21:27:42+5:302014-08-14T22:38:35+5:30
पुष्पसेन सावंत : माणगाव येथे शेतकरी मेळावा

आकारीपड प्रश्न हद्दपार करा
माणगाव : माणगाव खोऱ्यातील आकारीपड जमिनी सरकारी वाटप प्रक्रियेत सहभाग घेऊन सर्र्वांनी आपआपल्या वहिवाटीप्रमाणे वहिवाट सिद्ध करुन नावावर करुन घ्याव्यात आणि आकारीपड जमीन हा शब्द माणगाव खोऱ्यातून हद्दपार करा, असे आवाहन माजी आमदार पुष्पसेन सावंत यांनी माणगाव खोऱ्यातील आकारीपड वहिवाटदार शेतकऱ्यांच्या मेळाव्यात केला.
या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर बाळ सावंत, डॉ. शरद पाटील, मुकूंद सरनोबत, मोहन सावंत, नागेश आईर, प्रमोद शेडगे, दादा बेळणेकर, शिवाजी सावंत, नामनाईक, उदय सावंत, अॅड. दीपक नेवगी, अॅड. नीता कविटकर, बाळ केसरकर उपस्थित होते. कायदेशीर मार्गदर्शन दीपक नेवगी व नीता कविटकर यांनी केले. दादा बेळणेकर व मोहन सावंत यांनीही मार्गदर्शन करुन आपणही सहकार्य करु असे सांगितले.मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आकारीपड जमीन नावावर करण्यासाठी शनिवारी १६ आॅगस्टला निवेदन देण्यासाठी मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन बाळ सावंत यांनी केले. तसेच या आकारीपड प्रश्नाला वाचा फोडून शेतकऱ्यांच्या भावना कोर्टात मांडून न्याय देण्याचे काम करणारे अॅड. राकेश पाटील व अॅड. देशमुख यांच्या अभिनंदनाचा ठरावही मांडला. डॉ. पाटील यांनीही शेतकऱ्यांच्या एकजुटीने हा प्रश्न सुटू शकतो.
जमीन वाटप प्रक्रियेत सहकार्य करुन हा प्रश्न शेवटच्या आकारीपड धारकाला त्याची जमीन मिळत नाही तोपर्यंत आपली एकजूट कायम राखा, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर कोराणे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
गेली साठ वर्षे आकारीपड हा प्रश्न भिजत पडत होता. अनेक मोर्चे, आंदोलने करुन हा प्रश्न सुटला नाही. म्हणून डॉ. शरद पाटील व बाळ सावंत यांचे मार्गदर्शनाखाली पुष्पसेन सावंत यांचे समवेत कोर्टात याचिका दाखल करावी लागली आणि त्यानुसार कोर्टाचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना झाले. हा आपल्या एकजुटीचा विजय असून आपली वहिवाट कागदोपत्री सिद्ध करुन वाटपप्रक्रियेत सहभागी होऊन सहकार्य करावे, असे मुकंूंद सरनोबत यांनी सांगितले.