शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

आंबोलीत मिळाला पट्टेरी वाघ असल्याचा पुरावा; शेतकऱ्यांच्या गाईचा पाडला पडशा, कॅमेऱ्यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 22:28 IST

परिसरात भीतीचे वातावरण, हिरण्यकेशी जंगल भागात लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यात पट्टेरी वाघ टिपला गेला आहे

सावंतवाडी:  आंबोली हिरण्यकेशी परिसरात पट्टेरी वाघ असल्याचा पुरावा वनखात्याला मिळाला असून वनविभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात हा पट्टेरी वाघ कैद झाला आहे.

सह्याद्री पट्ट्यात कोयना राधानगरी चांदोली अभयारण्यात जंगल भागात तसेच तिलारी जंगल भागात हा पट्टेरी वाघ आपले बस्तान मांडून आहे सदर पट्टेरी वाघाचे दर्शन वनखात्याने जंगल भागात लावलेल्या कॅमेरा टिपले गेले आहे सदर पट्टेरी वाघ आंबोली हिरण्यकेशी जंगल भागात असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे त्यामुळे गेल्या दोन दिवसापूर्वीच आंबोली येथील एका शेतकऱ्यांच्या गाईचा पडशा पाडला होता. या पट्टेरी वाघाने पडला होता.

यावेळी ग्रामस्थांनी पट्टेरी वाघाचे वास्तव्य असल्याचा दावाही केला होता परंतु यावेळी ग्रामस्थांच्या म्हणण्याकडे वनविभागाकडून कानाडोळा करण्यात आला होता.परंतु हिरण्यकेशी जंगल भागात लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यात पट्टेरी वाघ टिपला गेला आहे त्यामुळे आंबोलीत पट्टेरी वाघ वास्तव्यास असल्याचे सिद्ध झाले आहे. सह्याद्री पट्ट्यात राधानगरी ते तिलारी घाट परिसरात जे कोल्हापूर सिंधुदुर्ग या सह्याद्रीच्या जंगल भागात गेल्या काही वर्षापासून पट्टेरी वाघ आपले बस्तान मांडून आहे सह्याद्रीचा पट्टा हा पट्टेरी वाघा चे राज्य झाले आहे सध्या कोकण व पश्चिम महाराष्ट्रात एक मेळाव पट्टेरी वाघ सर्वत्र फेरफटका मारत असल्याचे वनखात्याने स्पष्ट केले असून मागील काही  वर्षापूर्वी आंबोली त पाटगाव च्या जंगलात ब्लॅक पॅथर ही आढळून आला होता.त्यानंतर पट्टेरी वाघाचे अस्तित्व आढळून आल्याने वनविभागाची जबाबदारी आणखी वाढली आहे.पूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारीच्या जंगलात पाच वाघाचे अस्तित्व आढळून आले होते.मात्र नंतर ही संख्या शून्य वर आली होती.

टॅग्स :Tigerवाघforestजंगल