शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सर्वत्र भातशेती तरारली...

By admin | Updated: July 22, 2014 21:51 IST

दुबार पेरणीचे संकट टळले : सतत पाऊस पडल्याने शेतकरी सुखावला

चिपळूण : सध्या पाऊस स्थिरावला असल्याने लावणीची कामे वेगात सुरु आहेत. तसेच लावणी केलेली भाताची रोपे आता चांगलीच तरारली आहेत. त्यामुळे शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण आहे. चालू मोसमात पाऊस कमालीचा लांबला. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर आले होते. काही ठिकाणी रोपे उगवली होती. ती सुकून जातात की काय? अशी भीती निर्माण झाली होती. शेतकरीवर्ग चिंतातूर झाला होता. पावसाकडे त्याचे डोळे लागले होते. परंतु, जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेला पाऊस समाधानकारक पडत असल्याने लावणीची कामे वेगात सुरु आहेत. यावर्षी पाऊस कमी पडत असला तरी सध्या गरजेइतका पाऊस पडत असल्याने शेतकरी सुखावला आहे. चालू मोसमात सरीवर सरी कोसळत आहेत. त्यामुळे नदी, नाले भरुन वाहात आहेत. वरकस ठिकाणीही पाणी झाल्याने डोंगराळ भागातही धरपाण्याच्या लावणीचे काम सुरू झाले आहे. आतापर्यंत ७० टक्क्यांपेक्षा जास्त लावणीचे काम पूर्ण झाले आहे. पावसाचे वेळापत्रक बिघडले असून, या मोसमात पाऊस फारसा पडण्याची अपेक्षा नाही. वातावरणाचा अंदाज घेऊन कामे पूर्ण करीत आणली आहेत. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत यंदा पिकावर परिणाम होणार आहे. (प्रतिनिधी)