शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

खावटी कर्जमाफी रक्कम मिळणार कधी...?,जाहीर करून उलटले अनेक महिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 13:29 IST

शासनाने खावटी कर्जमाफी जाहीर करून व त्यानुसार ऑनलाईन अर्ज सादर करून अनेक महिने उलटले तरी शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर अजून एक रुपयाही जमा केलेला नाही. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देखावटी कर्जमाफी रक्कम मिळणार कधी...?,जाहीर करून उलटले अनेक महिनेसिंधुदुर्ग जिल्ह्यात ९६९४ शेतकरी लाभास पात्र

सिंधुदुर्गनगरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी महाराष्ट्र शासनाने खावटी कर्जमाफी जाहीर केली आहे.त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९ हजार ६९४ शेतकरी पात्र ठरले असून त्यांनी ऑनलाईन अर्ज शासनाला सादर केलेले आहेत.

प्रत्यक्षात शासनाने खावटी कर्जमाफी जाहीर करून व त्यानुसार ऑनलाईन अर्ज सादर करून अनेक महिने उलटले तरी शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर अजून एक रुपयाही जमा केलेला नाही. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण झाला आहे.महाराष्ट्र शासनाने २०१७ मध्ये मोठ्या स्वरूपाची शेतकरी कर्जमाफी जाहीर केली. त्यानुसार अनेक शेतकरी कर्जमुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत शेतीसाठी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी होती. त्यातही परतफेड करणारे जास्त होते. मात्र, शेतीपूरक छोट्या व्यवसायासाठी खावटी कर्ज घेणारे शेतकरी या जिल्ह्यात जास्त आहेत.

हे कर्ज जिल्हा बँकेने पतसंस्थानच्या माध्यमातून जिल्हा बँकेने पुरविले होते. त्यामुळे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी शासनाने खावटी कर्ज माफ करावे, अशी मागणी लावून धरली होती.त्यानुसार लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी शासनाने काही महिने अगोदर सिंधुदुर्ग व कोल्हापूर या जिल्ह्यासाठी खावटी कर्जमाफी जाहीर केली होती. त्यानुसार खावटी कर्जदार शेतकरी यांच्याकडून ऑनलाईन अर्ज शासनाने मागवून घेतले होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशाप्रकारे कर्ज घेतलेले शेतकरी १० हजार ५२१ आहेत. त्यासाठी १६ कोटी २२ लाख ७८ हजार एवढा निधी लागणार होता. तर २२६ पतसंस्थानी हे कर्ज पुरविले होते. मात्र, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने केलेल्या तपासणीत १९२ पतसंस्था कर्जमाफिस पात्र ठरल्या आहेत. या पतसंस्थानी पुरविलेल्या खावटी कर्जातील ९ हजार ६९४ शेतकरी लाभास पात्र ठरले असून त्यासाठी १३ कोटी ३७ लाख एवढी रक्कम अपेक्षित आहे.

या सर्व शेतकरी बंधूनी लाभासाठी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत. त्यानंतर अनेक महिन्याचा कालावधी लोटला. लोकसभा निवडणूक आचार संहितेनंतर हि रक्कम खात्यात जमा होणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप शासनाकडून याबाबत कोणतीच हालचाल दिसत नाही. त्यामुळे नेमकी खावटी कर्जमाफी मिळणार कि नाही ? असा संभ्रम संबंधित लाभार्थी शेतकरी यांच्यात निर्माण झाला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्ग