काँग्रेसची सत्ता असतानाही पाडलोसकडे दुर्लक्ष

By Admin | Updated: April 1, 2015 00:14 IST2015-03-31T21:17:37+5:302015-04-01T00:14:02+5:30

पाडलोस येथे सत्कार : वैभव नाईक यांचा आरोप

Even if the Congress is ruled by the leader, it is not neglected | काँग्रेसची सत्ता असतानाही पाडलोसकडे दुर्लक्ष

काँग्रेसची सत्ता असतानाही पाडलोसकडे दुर्लक्ष

मडुरा : पाडलोस गावाचा विकास व्हावा तसा झाला नाही. अनेक समस्या येथील तरुणांना भेडसावत आहेत. काँग्रेसची सत्ता असताना पाडलोसकडे दुर्लक्ष करण्यात आले. परंतु आता शिवसेना-भाजपची सत्ता आहे. त्यामुळे पाडलोस गावच्या विकासासाठी राज्यमंत्री, खासदार यांच्या माध्यमातून जिल्हाप्रमुख निधी उपलब्ध करून देणार, असे प्रतिपादन शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी पाडलोस येथे केले. आमदार वैभव नाईक यांचा सोमवारी पाडलोस येथे सत्कार करण्यात आला. यावेळी बोलत होते. विश्वनाथ नाईक यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. पाडलोस गावाच्या विकासासाठी आपण राज्यमंत्री दीपक केसरकर आणि खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आमदार नाईक यांनी सांगितले.
यावेळी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, युवासेना जिल्हाध्यक्ष मंदार शिरसाट, युवासेना तालुकाध्यक्ष सागर नाणोसकर, दांडेली सरपंच बाळा मोरजकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शाखाप्रमुख राजू शेटकर यांनी केले. यावेळी उपशाखाप्रमुख महेश कुबल, मडुरा शाखाप्रमुख श्रीकृष्ण भोगले, अमोल नाईक, श्रीधर परब, अमोल कोरगावकर व पाडलोस ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Even if the Congress is ruled by the leader, it is not neglected