शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

संपूर्ण जिल्हा सीसीटीव्ही नियंत्रणाखाली, सिंधुदुर्ग राज्यात पहिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 18:23 IST

संपूर्ण जिल्हा सीसीटीव्हीच्या कक्षेत आणण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ असून सिंधुदुर्ग जिल्ह्याला हा मान मिळाल्याचे कौतुक आहे, असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देसंपूर्ण जिल्हा आला सीसीटीव्ही नियंत्रणाखालीसिंधुदुर्ग राज्यात पहिला: देशमुख

सिंधुदुर्ग : संपूर्ण जिल्हा सीसीटीव्हीच्या कक्षेत आणण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ असून सिंधुदुर्ग जिल्ह्याला हा मान मिळाल्याचे कौतुक आहे, असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले. जिल्ह्यातील सीसीटीव्ही सनियंत्रण योजनेचे गृहमंत्री देशमुख यांच्या हस्ते व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत आॅनलाईन लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते.या सोहळ्यास खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम हे जिल्हा पोलीस मुख्यालयामध्ये उपस्थित होते. तर आमदार दीपक केसरकर, आमदार नीतेश राणे यांच्यासह सर्व नगराध्यक्ष, पोलीस ठाण्याचे प्रमुख आॅनलाईन उपस्थित होते.जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी सर्वांचे स्वागत केले व शेवटी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी यांनी केले. यावेळी खासदार विनायक राऊत यांनी पोलीस दलाचे अभिनंदन केले. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील महिला अधिक सुरक्षित होतील, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या.पोलीस, महसूल, आरोग्य यंत्रणेचे कौतुक : देशमुखजिल्ह्याचे आजी व माजी दोन्ही पालकमंत्र्यांनी चांगले काम केले असल्याचे सांगून गृहमंत्री पुढे म्हणाले की, गुन्हेगारी कमी करण्यासाठी, कायदा व सुव्यवस्ता राखण्याच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे हे अतिशय उपयुक्त आहेत. सध्याच्या कोरोनाच्या काळात जिल्ह्यातील पोलीस दल, महसूल यंत्रणा, आरोग्य यंत्रणा अहोरात्र काम करीत आहे. त्यांच्या कामाचे मला कौतुक आहे, असेही ते म्हणाले.गुन्हेगारी कमी होण्यास मदत : उदय सामंतडीपीडीसीमधून मिळालेल्या निधीचा सदुपयोग जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी चांगल्याप्रकारे केला आहे. ही यंत्रणा जिल्ह्यासाठी नक्कीच वरदान ठरणार आहे. गुन्हेगारी कमी करण्यासोबतच यामुळे जिल्ह्याच्या विकासालाही चालना मिळणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले.निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न : केसरकरआमदार दीपक केसरकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्ममातून निधी उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचेही सांगितले.चांगल्या कामासाठी सर्वांनी एकत्र यावे : नीतेश राणेआमदार नीतेश राणे यांनीही यावेळी पोलीस दलाचे अभिनंदन केले. अशा चांगल्या कामांमुळे जिल्ह्यातील सर्वांनी एकत्र काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

टॅग्स :cctvसीसीटीव्हीsindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस