अभियंत्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करा
By Admin | Updated: July 23, 2016 00:21 IST2016-07-22T22:53:13+5:302016-07-23T00:21:28+5:30
पोलिस निरीक्षकांशी चर्चा : आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची मागणी

अभियंत्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करा
कणकवली : महामार्गावरील खड्डयांमुळे झालेल्या अपघातात आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ कार्यकर्ते उत्तम पवार यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या मृत्युला महामार्ग प्राधिकरण अभियंत्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी करीत आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते शुक्रवारी आक्रमक झाले होते. या कार्यकर्त्यांनी तसेच पदाधिकाऱ्यांंनी पोलिस निरीक्षक सुनील मोरे यांची येथील पोलिस स्थानकात भेट घेत त्यांच्याकडे मागणी केली.
यावेळी सुदीप कांबळे, अंकुश कदम , गौतम खुडकर, किशोर राणे, विद्याधर तांबे, सुरेश पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते. शुक्रवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास या कार्यकर्त्यांनी पोलिस निरीक्षक सुनील मोरे यांची भेट घेतली. तसेच अपघातप्रकरणी स्वत: पोलिसांनी तक्रार दाखल करावी आणि महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी केली. तसेच असे न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.
दरम्यान, या अपघात प्रकरणी सखोल चौकशी करण्यात येईल असे आश्वासन पोलिस निरीक्षकांनी यावेळी उपस्थितांना दिले. त्यामुळे आक्रमक कार्यकर्ते काहीसे शांत झाले. (वार्ताहर)