बॅकवॉटर फेस्टिवलमधून पर्यटकांना आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2015 00:34 IST2015-12-29T22:29:30+5:302015-12-30T00:34:35+5:30

गोवळकोट धक्क्यावरून आयलँड पार्क व तेथून पुढे क्रोकोडाईल सफारी हा साराच प्रवास थक्क करणारा आहे. भरती ओहोटीच्या काळात येथील सौंदर्य अधिकच खुलून दिसते.

Enjoy the tourists at the Backwater Festival | बॅकवॉटर फेस्टिवलमधून पर्यटकांना आनंद

बॅकवॉटर फेस्टिवलमधून पर्यटकांना आनंद

चिपळूण : येथील ग्लोबल चिपळूण टुरिझमच्या माध्यमातून बॅकवॉटर फेस्टिवल व क्रोकोडाईल सफारी सुरु असून, पर्यटकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोकणच्या पर्यटनात विशेषकरून दाभोळ खाडीत असलेल्या जैवविविधतेचा ठेवा पर्यटकांपर्यंत पोहोचत आहे. एका बाजूला महेंद्रगिरी पर्वतावर वसलेले भगवान परशुरामाचे ऐतिहासिक मंदिर, सवतसडा, तर दुसऱ्या बाजूला गोविंदगड पर्यटकांना भुरळ पाडतो. दाभोळ खाडी किनारी असलेल्या नारळी, पोफळीच्या बागा, समोर दिसणाऱ्या मगरी व पाणपक्षी पर्यटकांना तासनतास खेळवून ठेवतात. त्यामुळे हा ठेवा पाहण्याचा योग ग्लोबल चिपळूण टुरिझम संस्थेच्या माध्यमातून पर्यटकांना येत आहे. आयलँड पार्क येथे विसावा घेताना या बेटाच्या चारही बाजूला असलेल्या वनसंपदेकडे पर्यटक कुतुहलाने पाहात आहेत.गोवळकोट धक्क्यावरून आयलँड पार्क व तेथून पुढे क्रोकोडाईल सफारी हा साराच प्रवास थक्क करणारा आहे. भरती ओहोटीच्या काळात येथील सौंदर्य अधिकच खुलून दिसते. रविवारी हिंदी - मराठी गाण्यांचा आविष्कार व मॅजिक शो, विविध स्पर्धात यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ, सोमवारी सायली पराडकर यांच्या लावणीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. ग्लोबलचे अध्यक्ष राम रेडीज, उपाध्यक्ष इब्राहीम दलवाई, संजीव अणेराव, संचालक सुनील साळवी, समीर कोवळे, प्रेरणा लाड, महेंद्र कासेकर आदी सर्व संचालक या मोहिमेत कार्यरत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Enjoy the tourists at the Backwater Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.