शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्जानिर्मिती कागदावरच

By admin | Updated: May 19, 2015 00:29 IST

खारलँड : घोडे अडले निर्मितीसाठीच्या उपकरणांच्या खर्चापाशी

रत्नागिरी : तालुक्यातील दोन खारलँड बंधाऱ्यांवर अपारंपारिक ऊर्जा तयार करण्याचा खारलँड विभागाचा प्रस्ताव अजूनही कागदावरच आहे. या अपारंपारिक ऊर्जा तयार करण्यासाठी लागणाऱ्या उपकरणांसाठी येणारा खर्च कोण करणार, असा प्रश्न या विभागाला सतावत आहे.जिल्ह्यात कोयना, रत्नागिरी गॅस, जिंदाल, फिनोलेक्स असे वीज तयार करणारे मोठे प्रकल्प आहेत. तरीही राज्याला विजेची कमतरता भासते. उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात भारनियमन करण्यात येते. त्यानंतर आता जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प येत आहे.जिल्ह्यात १७१ खारलँड बंधारे बांधण्यात येणार असून आतापर्यंत ६९ खारलँड बंधारे बांधण्यात आले आहेत़ समुद्राच्या लाटांच्या माध्यमातून अपारंपारिक ऊर्जा तयार करण्यासाठी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यामध्ये प्रयत्न करण्यात आला होता. तो अयशस्वी झाल्यानंतर खारलँड विभागानेही अपारंपारिक ऊर्जा तयार करण्यासाठी पावले उचलली होती. त्यासाठी रत्नागिरी तालुक्यातील गावडे आंबेरे व चाफेरी कासारी या गावांतील खारलँड बंधाऱ्यांची निवड केलेली आहे.या बंधाऱ्यांमध्ये समुद्राचे पाणी वेगात आतमध्ये शिरत असल्याने त्याचा फायदा घेण्यात येणार आहे. गावडेआंबेरे खारलँडबंधाऱ्याला ६५ झडपे तर चाफेरी कासारी खारलँड बंधाऱ्याला २२ झडपे आहेत. या दोन्ही खारलँड बंधाऱ्यांच्या प्रत्येकी दोन झडपांचा वापर अपारंपारिक ऊर्जा तयार करण्यासाठी वापर करण्यात येणार आहे. दिवसातून २ वेळा भरती व २ वेळा ओहोटीच्या फायदा घेऊन ४ किलोवॅट ऊर्जा तयार करण्यात येणार आहे.ऊर्जानिर्मितीपूर्वी या बंधाऱ्यांचे सर्व्हेक्षण करण्यात येणार होते. त्यानंतर याबाबतचा प्रस्ताव मेढाकडे पाठविण्यात येणार होता. त्याची तयारीही सुरु झाली होती. मात्र, ही तयारी करीत असतानाच ही ऊर्जानिर्मितीसाठी सुरुवातीला त्यासाठी लागणाऱ्या उपकरणांसाठी खर्च मोठ्या प्रमाणात करावा लागतो. तो खर्च खारलँड विभागाला परवडणारा नाही. त्यामुळे हा खर्च कुठून करावा, असा प्रश्न खारलँड विभागासमोर उभा राहिला आहे. एवढा खटाटोप करेपर्यंत खर्चाचा प्रश्न खारलँड विभागाने विचारातच घेतला नव्हता. मात्र प्रत्यक्ष खर्च करण्याची वेळ आली त्यावेळी मात्र हा विभाग अडचणीत आला. त्यामुळे ऊर्जा तयार करण्याचा प्रस्ताव कागदावरच राहिला आहे. (शहर वार्ताहर)वीज फायदेशीर पण...खारलँड विभागाने निवडलेल्या दोन बंधाऱ्यांवर ४ किलोवॅट अपारंपारिक ऊर्जा तयार करण्यात येणार होती. त्यामुळे भविष्यात छोट्या गावांसाठी ही ऊर्जानिर्मिती फायद्याची ठरली असती. मात्र, खारलँडकडे त्यासाठी तरतूद नसल्याने हे प्रस्ताव बारगळलेले आहेत. ज्या ज्या ठिकाणी खारे पाणी घुसते, त्या त्या ठिकाणी खारलँड बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यामुळे ही वीज फायदेशर होती.