शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीतील अतिक्रमण पुन्हा हटविले!; विक्रेते, व्यापाऱ्यांनी नगरपंचायतीच्या पथकाशी घातली हुज्जत 

By सुधीर राणे | Updated: June 20, 2023 18:06 IST

काल, सोमवारच्या कारवाई नंतरही काही विक्रेत्यांनी पुन्हा आपली दुकाने रस्त्यावर थाटली होती

कणकवली: शहरातील बाजारपेठ रस्त्यावर विक्रेत्यांनी केलेल्या अतिक्रमणावर सोमवारी कणकवली नगरपंचायतच्या पथकाने अचानक  कारवाई केली. मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईत अप्पासाहेब पटवर्धन चौक ते झेंडा चौकापर्यंत रस्त्यावर लावलेल्या दुकानांना हटवण्यात आले होते. तर सर्व्हिस रस्त्यावरीलही काही दुकानांना हटवत कारवाई करण्यात आली होती. सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारीही पुन्हा कारवाई करण्यात आली.काल, सोमवारच्या कारवाई नंतरही काही विक्रेत्यांनी पुन्हा आपली दुकाने रस्त्यावर थाटली होती. त्यामुळे मंगळवारी पुन्हा नगरपंचायतकडून कारवाई करण्यात आली. यावेळी काहींचा माल जप्त करण्यात आला. रस्त्यावर दुकाने मांडत असल्याने कणकवली बाजारपेठेत नेहमीच वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत असतो. वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागतो. मात्र, याबाबत विक्रेत्यांकडून सूचना देऊन देखील कोणतीही नियमाचे पालन केले जात नव्हते. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांच्या सुचने नुसार पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत नगरपंचायतचे स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, कर्मचारी रवी म्हाडेश्वर यांच्यासह अन्य कर्मचारी सहभागी झाले होते. काही विक्रेत्यांनी व व्यापाऱ्यांनी नगरपंचायतच्या पथकाशी हुज्जत देखील घातली. तर नगरपंचायतकडून  किरकोळ विक्रेत्यांसाठी एक मोठ्या विक्रेत्यांना एक नियम लावला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली