सहाय्यक मत्स्य आयुक्तांना घेराओ

By Admin | Updated: July 15, 2015 00:18 IST2015-07-14T21:58:03+5:302015-07-15T00:18:26+5:30

मालवणातील पारंपरिक मच्छिमार आक्रमक : पर्ससीन बोटधारकांवर कारवाईबाबत विचारला जाब

Enclose Assistant Fish Commissioner | सहाय्यक मत्स्य आयुक्तांना घेराओ

सहाय्यक मत्स्य आयुक्तांना घेराओ

मालवण : २६/ ११ च्या दहशतवादी हल्यासारखी गंभीर घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल पारंपरिक मच्छिमारांनी सहाय्यक मत्स्य आयुक्त सुगंधा चव्हाण यांना करत मंगळवारी त्यांना घेराव घातला. निवती येथील विनापरवाना पर्ससीन मच्छिमार पालकमंत्री केसरकर यांच्या मतदार संघातील असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करायची नाही असे आदेश खुद्द पालकमंत्र्यांनी दिले का? असा संतापजनक सवालही मच्छिमारांनी उपस्थित केला.
संवेदनशील जिल्ह्यात २६/११ सारख्या दहशतवादी हल्ल्यासारख्या गंभीर घटना घडल्यास केवळ पंचनामा करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा येणार काय? अशी विचारणा केली. हा प्रकार गंभीर आहे. याबाबत माहिती घेऊन संबधितांवर कारवाई केली जाईल. मासेमारी बंद कालावधीत मासेमारी करणे हे गैर आहे. अनधिकृत मासेमारी करीत असलेल्या ट्रॉलरवर कारवाई निश्चितच करण्यात येईल, असे मत्स्य अधिकारी चव्हाण यांनी स्पष्ट केले. यावेळी विकी तोरसकर, दिलीप घारे, छोटू सावजी, बाबी जोगी, अन्वय प्रभू, सन्मेश परब यांच्यासह ३० ते ४० पारंपारिक मच्छिमार उपस्थित होते.
पर्ससीन मासेमारी आणि मत्स्य विभागाचे उदासीन धोरण याबाबत गप्प बसणार नाही. आपणास कारवाई करणे जमत नसेल तर आमच्या रोजीरोटीसाठी या विनापरवाना पर्ससीन विरोधात आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल. असेही मच्छिमारांनी स्पष्ट केले. (वार्ताहर)

आम्हाला नाहक तुरूंगात डांबले
शेकडो अनधिकृत पर्ससीन टॉलर्स
जिल्ह्यात आचरा व निवती या दोन ठिकाणी शेकडो अनधिकृत पर्ससीन ट्रॉलर्स आहेत. यातील वेंगुर्ला-निवतीत ९ तर आचऱ्यात २ परवानाधारक पर्ससीन आहेत. शासनाचेच अभय मिळत असल्याने पर्ससीन ट्रॉलर्सची संख्या वाढत आहे. यात छोट्या मच्छिमारांनी करायचे काय ? असा संतप्त सवाल मच्छिमारांनी केला.
हवाई यंत्रणेतून मासेमारीवर लक्ष ठेवणारी ड्रोन सिस्टीमही उपलब्ध करून अत्याधुनिक यंत्रणा शासनच्या दिमतीला देतो. यासाठी लागणारा पत्रव्यवहार तुम्ही वरिष्ठ कार्यालयाला पाठवा असे रविकिरण तोरसकर यांनी सांगितले. यावर चव्हाण यांनी वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार करून परवानगी मिळविण्यासाठी प्रयत्न करते असे सांगितले. दरम्यान याबाबत मच्छिमारांनी मालवणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत लांगी यांची भेट घेत त्या दोन संशयास्पद बोटीबाबत कल्पना दिली आहे.

विनापरवाना पर्ससीन व पारंपारिक मच्छिमार यांच्यात संघर्ष होण्यामागे मत्स्य विभागाचे उदासीन धोरण, जुने कायदे आणि अधिकाऱ्यांचे पर्ससीन मच्छिमारांशी असलेले लागेबांधे ही प्रमुख करणे आहेत. यामुळे पारंपरिक मच्छिमार बांधव दिवसेंदिवस अडचणीत येत आहेत.
यापूर्वी कारण नसताना नाहक तुरुंगात जावे लागले मात्र यापुढे आमच्या कुटुंबापासून आम्हाला वेगळे करून अन्यायकारक कारवाई झाल्यास आम्ही गप्प बसणार नाही, अशी संतप्त भूमिका अन्वय प्रभू व मच्छिमारांनी घेतली.

मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करणाऱ्यांवर १९८१ च्या अधिनियमाप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल. विनापरवाना मासेमारी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे अधिकार तहसीलदार यांना आहेत. अनधिकृत मासेमारीवर लवकरच कारवाई करण्यात येईल.
- सुगंधा चव्हाण,
सहाय्यक मत्स्य आयुक्त, मालवण

निवती किनारपट्टी संवेदनशील आहे. पावसाळी हंगामात रात्रीच्या वेळी मासेमारीसाठी गेल्यास मासळी मिळत नाही. मात्र संशयास्पद बोट किनारपट्टीवर असल्यापासून निवती येथील बोट आणि त्या बोट यांचे काहीतरी लागेबांधे आहेत. प्रशासकीय यंत्रणेला माहिती देऊनही त्यांना अभय दिले जात आहे.
- छोटु सावजी, मच्छिमार नेते

Web Title: Enclose Assistant Fish Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.