शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अवैध चाललेल्या एलईडी मासेमारीवर कारवाईसाठी कडक कायदा करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 11:33 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी हद्दीत व १२ नॉटिकल मैलाच्या बाहेर अवैधरित्या सुरू असलेल्या एलईडी मासेमारीवर कारवाईसाठी कडक कायदा करा, अशी मागणी पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांनी मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांच्याकडे केली.

ठळक मुद्देअवैध चाललेल्या एलईडी मासेमारीवर कारवाईसाठी कडक कायदा करावालक्ष वेधले : केसरकर, नाईक यांनी मत्स्य व्यवसाय मंत्र्यांची मंत्रालयात घेतली भेट

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी हद्दीत व १२ नॉटिकल मैलाच्या बाहेर अवैधरित्या सुरू असलेल्या एलईडी मासेमारीवर कारवाईसाठी कडक कायदा करा, अशी मागणी पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांनी मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांच्याकडे केली.एलईडी मासेमारीच्या प्रश्नासंदर्भात आज पालकमंत्री केसरकर, आमदार नाईक यांनी मंत्रालयात मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर, मत्स्य विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यांची भेट घेत लक्ष वेधले. यावेळी अवैधरित्या मासेमारी करणाऱ्या एलईडी बोटी जप्त करून त्या नष्ट करण्यासाठी एलईडी मासेमारी विरोधातील कायद्यात बदल करण्याबाबत चर्चा झाली.

यावर अनुपकुमार यांनी एलईडी मासेमारीवर कडक कारवाईसाठी केंद्र, राज्य सरकार सकारात्मक असून कडक कायदा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले आहे, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली. एलईडीच्या विध्वंसकारी मासेमारीमुळे पारंपरिक मच्छिमारांचा व्यवसाय धोक्यात आहे.

मासळीची बेसुमार लूट होत असल्याने आमदार नाईक यांनी या मासेमारीवर कडक कायदा अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन मच्छिमारांना दिले. या पार्श्वभूमीवर मंत्रालयात झालेल्या बैठकीत एलईडी मासेमारी प्रश्नाकडे पालकमंत्री केसरकर व आमदार नाईक यांनी अनुपकुमार यांचे लक्ष वेधले.बोटी पकडण्यासाठी हायस्पीड नौका देणार !जिल्ह्याच्या सागरी हद्दीबरोबरच १२ नॉटिकल मैलाच्या बाहेर मासेमारी करणाऱ्या एलईडी मासेमारीवर कारवाई व्हावी यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाच्या मदतीने कडक कायदा करण्याची मागणी आमदार नाईक यांनी केली. त्याचबरोबर कारवाईदरम्यान पकडलेल्या बोटी जप्त करून त्या नष्ट करण्यासाठी कायद्यात बदल करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.

यावेळी सचिव अनुपकुमार यांनी अवैधरित्या सुरू असलेल्या एलईडी मासेमारीवर कडक कारवाईसाठी केंद्र व राज्य सरकार सकारात्मक असून कडक कायदा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच अवैधरित्या मासेमारी करणाऱ्या बोटी पकडण्यासाठी लवकरच हायस्पीड गस्तीनौका दिली जाईल असे स्पष्ट केले, अशी माहितीही नाईक यांनी दिली.

टॅग्स :fishermanमच्छीमारsindhudurgसिंधुदुर्ग