शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महाआरतीद्वारे मंदिरासाठी एल्गार :प्रमोद जठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 19:04 IST

bjp, pramod jathar, temple, shindhudurgnews महाराष्ट्रात दारुचे बार सुरू होतात. चित्रपटगृहे सुरू होतात. रेस्टॉरंट्स व लॉजे सुरू होतात. पर्यटन स्थळे, मस्तीचे धंदे जोरात सुरू होतात पण भाविकांच्या श्रद्धेची आणि भक्तीची स्थाने असलेली मंदिरे महाराष्ट्रात सुरू होऊ शकत नाहीत हे लाजिरवाणे दुर्दैव आहे. त्यामुळे आता महाआरतीच्या एल्गारानेच सरकारला मंदिरे उघडायला भाग पाडूया, असे आवाहन भाजपचे प्रदेश सचिव प्रमोद जठार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष यांना पत्राद्वारे केले आहे.

ठळक मुद्देमहाआरतीद्वारे मंदिरासाठी एल्गार :प्रमोद जठार भाजपा प्रदेशाध्यक्षांना पत्राद्वारे आवाहन

कणकवली : महाराष्ट्रात दारुचे बार सुरू होतात. चित्रपटगृहे सुरू होतात. रेस्टॉरंट्स व लॉजे सुरू होतात. पर्यटन स्थळे, मस्तीचे धंदे जोरात सुरू होतात पण भाविकांच्या श्रद्धेची आणि भक्तीची स्थाने असलेली मंदिरे महाराष्ट्रात सुरू होऊ शकत नाहीत हे लाजिरवाणे दुर्दैव आहे. त्यामुळे आता महाआरतीच्या एल्गारानेच सरकारला मंदिरे उघडायला भाग पाडूया, असे आवाहन भाजपचे प्रदेश सचिव प्रमोद जठार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष यांना पत्राद्वारे केले आहे.जठार म्हणतात, महाराष्ट्रात आज जर काँग्रेसचा मुख्यमंत्री असता आणि शिवसेना विरोधी पक्षात असली असती तर मंदिरांबाबत त्यांची हीच भूमिका असली असती का ? हा खरा कळीचा मुद्दा आहे. आघाडीतल्या पक्षांच्या इच्छेनुसार इथे महाराष्ट्रात दारुचे बार सुरू होतात. चित्रपटगृहे सुरू होतात. रेस्टॉरंट्स आणि लॉज सुरू होतात. ज्या जगदंबेचे नाव घेत छत्रपती शिवरायांनी मंदिरांना सन्मान देणारे स्वराज्य महाराष्ट्रात निर्माण केले, त्याच महाराष्ट्रात नवरात्राच्या पवित्र वातावरणातही आज मंदिरे बंद आहेत. त्याच आई जगदंबेच्या दर्शनासाठी पुन्हा एकदा ह्यदार उघड बये दार उघडह्ण म्हणत टाहो फोडायची वेळ या ठाकरे सरकारने आणली आहे.

केवळ स्वतःच्या सत्तेसाठी पांघरलेला हा शिवसेनेचा स्वार्थी दुटप्पीपणा उघड करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आता एल्गार पुकारला पाहिजे. आता याला एकच पर्याय. जोपर्यंत भाविकांची श्रद्धास्थाने असलेली ही मंदिरे उघडली जात नाहीत तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर सगळ्या जिल्ह्यात, तालुक्यात आणि गावागावात, शहरा शहरात मंदिरांच्या बाहेर रस्त्यावर महाआरतीची आता सुरुवात करावी लागेल, असेही पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :BJPभाजपाTempleमंदिरReligious Placesधार्मिक स्थळेsindhudurgसिंधुदुर्गPramod Jatharप्रमोद जठार