शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग: घरावर वीज कोसळून नुकसान, कारिवडेतील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 16:48 IST

सावंतवाडीसह परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच तालुक्यातील कारिवडे-डंकवाडी येथे एका घरावर विजेचा लोळ कोसळला. त्यामुळे घरातच मोठा खड्डा तयार झाला असून घरात असलेल्या आई- वडिलांसह मुलगी जखमी झाली आहे. मात्र, या घटनेत अन्य एक जण थोडक्यात बचावला. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली आहे.

ठळक मुद्देघरावर वीज कोसळून नुकसान, कारिवडेतील घटना  तिघे जखमी, आई-वडिलांसह मुलीचा समावेशसावंतवाडी परिसरात दमदार पाऊस

सावंतवाडी : सावंतवाडीसह परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच तालुक्यातील कारिवडे-डंकवाडी येथे एका घरावर विजेचा लोळ कोसळला. त्यामुळे घरातच मोठा खड्डा तयार झाला असून घरात असलेल्या आई- वडिलांसह मुलगी जखमी झाली आहे. मात्र, या घटनेत अन्य एक जण थोडक्यात बचावला. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली आहे.सावंतवाडीत सोमवारी दुपारच्या सुमारास अचानक ढगांचा गडगडाट होऊ लागला. तसेच काही वेळानंतर विजांचा लखलखाटही सुरू झाला. हा प्रकार बराच वेळ सुरू होता. मात्र काही काळानंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली. तब्बल एक तास पाऊस कोसळत होता. या पावसामुळे जनजीवन चांगलेच विस्कळीत बनले होते. बाजारात आंबा विक्रीसाठी बसलेल्यांना याचा चांगलाच त्रास झाला. सर्व आंबे भिजून गेले.

विजेचा लोळ कौले फोडून घरात आला. विजेच्या लोळाने घरात जमिनीला पडलेला खड्डा.या पावसामुळे व विजेच्या कडकडाटामुळे शहरातील बहुतांशी भागातील बत्ती गुल झाली होती. तसेच दूरसंचार यंत्रणाही ठप्प झाली होती. आंबोलीतही मुसळधार पावसाचा कहर सुरू होता. पण गेले चार ते पाच दिवस आंबोलीत पावसाची रिपरिप सुरू आहे. मात्र यात कोणतेही नुकसान झाले नाही. कारिवडे-माडखोल परिसरात मोठ्या प्रमाणात विजेचा लखलखाट होत होता.

विजेचा लोळ कौले फोडून घरात आला. विजेच्या लोळाने घरात जमिनीला पडलेला खड्डा दिसत असून विजेच्या तीव्रतेने घरातील विद्युत मीटर जळून तो घराच्या बाहेर फेकला गेला.त्यातूनच एक विजेचा लोळ कारिवडे-डंकवाडी येथील अंकुश रेडकर यांच्या मालकीच्या घरावर कोसळला. घरात यावेळी पत्नी अनिता रेडकर व त्यांची मुलगी अंकिता रेडकर होत्या. अचानक विजेचा कडकडाट होत वीज घरावर कोसळली.

विजेची तीव्रता एवढी भीषण होती की, विजेच्या लोळाबरोबरच आतील विद्युत मीटर घरातून बाहेर फेकला गेला. तर घराच्या मध्यभागी एक मोठा खड्डा पडला. तसेच घरात असलेल्या अंकुश यांच्यासह त्यांची पत्नी व मुलगी यांना याचा जबर दणका बसला. विजेच्या लोळामुळे तिघेही जखमी झाले. त्यांना कुटीर रूग्णालयात दाखल केले.ही घटना घडली तेव्हा अंकुश यांचा मुलगा अंगणात होता. त्यामुळे तो थोडक्यात बचावला आहे. या घटनेनंतर कारिवडे परिसरात एकच खळबळ उडाली होती. कारिवडे ग्रामस्थांनी डंकवाडी येथील रेडकर यांच्या घरी धाव घेत झाला प्रकार पाहिला व रेडकर कुटुंबास मदत केली. सोमवारी पडलेल्या पावसावेळी मोठ्या प्रमाणात विजा कडकडत होत्या. तसेच ढगांचा गडगडाट सुरू होता. त्यामुळे सर्वत्र सतर्कतेचे आदेश देण्यात आले होते.रेडकर कुटुंबीयांचे मोठे नुकसानविजेचा लोळ घरावर पडताच विद्युत मीटर जळून तो घराबाहेर पडला. याचबरोबर घरातील विद्युत फिटींग जळून खाक झाली. काही विद्युत उपकरणेही निकामी झाली. त्यामुळे रेडकर यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच या दुर्घटनेत तिघे जखमी झाले आहेत. 

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग