सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:23 IST2017-09-02T00:23:35+5:302017-09-02T00:23:35+5:30
कणकवली : जिल्ह्यातील ४२९ पैकी ३२५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, १४ आॅक्टोबर रोजी या ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल
लोकमत न्यूज नेटवर्क
कणकवली : जिल्ह्यातील ४२९ पैकी ३२५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, १४ आॅक्टोबर रोजी या ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. यासाठीची आचारसंहिता शुक्रवार (दि. १ सप्टेंबर) पासून सुरू झाली आहे. उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी सात दिवसांची मुदत मिळणार असून सकाळी ११ ते सायंकाळी ४.३० या वेळात दिनांक २२ ते २९ सप्टेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. या निवडणुकांसाठीची मोर्चेबांधणीही सुरू झाली आहे. सरपंच निवड थेट जनतेतून असल्याने गावागावांतील चांगला चेहरा समोर आणण्याचे मोठे आव्हान राजकीय पक्षांसमोर असणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डिसेंबर २०१७ मध्ये मुदत संपणाºया ३२५, तर जानेवारी २०१८ मध्ये मुदत संपणाºया १५ ग्रामपंचायती आहेत. सध्या डिसेंबरमध्ये मुदत संपणाºया ३२५ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्तांनी जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने कार्यक्रम आणि निवडणुकीसाठीची आचारसंहिता अंमलबजावणी शुक्रवारी (दि. १ सप्टेंबर) सायंकाळी ४ वाजल्यापासून सुरू केली आहे.
मोर्चेबांधणीला वेग
जिल्ह्यातील एकूण ४२९ ग्रामपंचायतींपैकी तब्बल ३२५ एवढ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका १४ आॅक्टोबर रोजी होत आहेत. यासाठीची आचारसंहिताही संबंधित ग्रामपंचायत परिसरात लागू झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायती आपल्याच ताब्यात राहाव्यात यासाठी जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. यावेळी सरपंच थेट जनतेतून निवडायचा असल्याने सरपंच पदासाठी योग्य अशा उमेदवाराचा शोध सर्वच पक्षांना घ्यावा लागणार आहे.
निवडणूक कार्यक्रम
१४ सप्टेंबरला तहसीलदारांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे, नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा दिनांक २२ ते २९ सप्टेंबर, अर्जांची छाननी ३ आॅक्टोबर सकाळी ११ वाजल्यापासून, नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक ५ आॅक्टोबर दुपारी ३ वाजेपर्यंत, अंतिम निवडणूक लढविणाºया उमेदवारांची यादी जाहीर करणे व निवडणूक चिन्ह देणे ५ आॅक्टोबर दुपारी ३ वाजल्यानंतर, मतदान १४ आॅक्टोबर सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वा. पर्यंत, मतमोजणी १६ आॅक्टोबर आणि निवडणूक निकाल जाहीर करण्याचा अंतिम दिनांक १७ आॅक्टोबर असा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
तालुकानिहाय निवडणूक होणाºया ग्रामपंचायती
वेंगुर्ला तालुक्यात २३, कुडाळ ५४, सावंतवाडी ५२, दोडामार्ग २८, वैभववाडी १७, कणकवली ५८, देवगड ३८, मालवण ५५ अशा ३२५ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.