शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: वझरेत एकाचवेळी अठरा परप्रांतीय कामगारांना मलेरियाची लागण, आरोग्य विभागात खळबळ 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: August 31, 2023 17:28 IST

दोडामार्ग ( सिंधुदुर्ग ) :सध्या सर्वत्र तापसरीच्या साथीने लोक बेजार झाले असताना वझरे येथील आंगण गृहप्रकल्पात काम करणाऱ्या तब्बल ...

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) :सध्या सर्वत्र तापसरीच्या साथीने लोक बेजार झाले असताना वझरे येथील आंगण गृहप्रकल्पात काम करणाऱ्या तब्बल अठरा परप्रांतीय कामगारांना मलेरियाची लागण झाल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.त्यामुळे खडबडून जागा झालेला आरोग्यविभाग हाय अलर्ट झाला असून घटनास्थळी जात जंतुनाशक फवारणी करण्याचे काम आरोग्य कर्मचाऱ्यांनी हाती घेतले आहे.बदलत्या वातावरणामुळे दोडामार्ग तालुक्यात सध्या तापसरीची साथ सुरू आहे.त्यात साथीच्या तापाचा देखील समावेश आहे. डासांपासून लागण होणाऱ्या हिवतापाची साथ झपाट्याने वाढत आहे. वझरे येथे आंगण गृह प्रकल्प होत असून त्याठिकाणी इमारती उभारण्याचे काम चालू आहे. हे काम करण्यासाठी अनेक परप्रांतीय कामगार त्या ठिकाणी राहतात. गेली काही वर्षे चाललेल्या इमारतींचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे हे कामगार त्याच ठिकाणी बस्थान मांडून आहेत. इमारतींच्या आत व सभोवताली डबक्यात किंवा प्लास्टिक मध्ये पाणी साचून राहिले असल्याने त्या ठिकाणी डासांची पैदास वाढली आहे. या डासांपासून तेथील कामगारांना हिवतापाची लागण झाली. हिवतापाची लागण झाल्याचे कळताच आरोग्य विभागाने त्या ठिकाणी जाऊन संपूर्ण इमारतींची व सभोवतालच्या परिसराची पाहणी केली. यावेळी ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यात डासांच्या अळी व डास निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. तसेच तेथील कामगारांची देखीक तपासणी केली. आतापर्यंत सुमारे १८ जण हिवताप बाधित झाले आहेत. त्या हिवताप बाधित १८ कामगारांना मोरगाव पिएससीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार गोराड हे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करीत आहेत. या प्रकारानंतर आरोग्य विभाग खडबडून जागे झाले आहे. काम चालू असलेल्या इमारतींमध्ये व सभोवताली साचलेल्या पाण्यात डासांची अळी शोधून काढून ती नष्ट करण्याचे काम हाती घेतले आहे. गेली चार दिवस ते किटक नाशक औषधाची फवारणी करीत आहेत. यावेळी जिल्हा हीवताप अधिकारी कार्यालय ओरोसचे कीटक नाशक सहाय्यक सागर किनळेकर, मोरगाव पीएससीचे आरोग्य सेवक अमोल गवस, आरोग्य सेवक विशाल यादव आदी त्याठिकाणी ही मोहीम राबवित आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMalariaमलेरियाHealthआरोग्य